नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात या पवन, अक्षय, मुकेश आणि विनय या चार दोषींना उद्या किंवा शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, कोर्टाबाहेर दोषी अक्षयची पत्नी पुनिता देवी बेशुद्ध पडून खाली कोसळली. अक्षयपासून घटस्फोट घेण्यासाठी पत्नी पुनिताने बिहार येथील कैटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, पुनीता सुनावणीला हजर नव्हती. त्यामुळे, आता हे सर्व फाशी टाळण्यासाठी केले गेलेले कृत्य असल्याचे समोर आले आहे.
Breaking: पवन गुप्ताची याचिका फेटाळली; उद्याच फासावर लटकवणार
Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीच्या पत्नीने घटस्फोटासाठी घेतली कोर्टात धाव
Nirbhaya Case : दोषींना फाशी देण्याच्या ट्रायलसाठी जल्लाद तिहारमध्ये आला; पण आधी केली कोरोनाची चाचणी
चार दोषींना फाशी देणे निश्चित झालेया खटल्यातील चार दोषींपैकी तीन जणांनी त्यांची फाशीची शिक्षा सुनावण्यास स्थगिती मिळावी यासाठी दिल्ली कोर्टात धाव घेतली होती. त्यातील एकाची आणखी एक दया याचिका प्रलंबित आहे. ५ मार्च रोजी कनिष्ठ कोर्टाने मुकेश सिंग (३२), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंग (३१) यांना फाशी देण्याचे नवीन चौथे डेथ वॉरंट बजावले. या चारही दोषींना 20 मार्च रोजी पहाटे 5:30 वाजता फाशी देण्यात येईल.