नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील दोषींना वेगवेगळी फाशी देण्याची मागणी करणारी केंद्र सरकारची याचिकेवरील सुनावणी ५ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. वर्ष २०१२ मधील दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात न्या. आर भानुमतींच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाला गृह मंत्रालयाच्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. यामध्ये दोषींना वेगवेगळी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. निर्भयाच्या चारही दोषींसाठी दिल्लीच्या न्यायालयाने आधीच डेथ वॉरंट जारी केलेले आहे. या डेथ वॉरंटनुसार त्यांना ३ मार्च रोजी फाशी दिली जाणार आहे.
Nirbhaya Case : आता घेतली निवडणूक आयोगाकडे 'या' दोषीने धाव
Nirbhaya Case : फाशी पुढे ढकलण्यासाठी दोषीनं भिंतीवर वारंवार आपटलं डोकं
दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही दोषींना ३ मार्च रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्याचे डेथ वॉरंट जारी केले आहे. चारही दोषी मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनयकुमार शर्मा आणि अक्षयकुमार यांना फाशी देण्यासाठी तिसरं डेथ वॉरंट जारी केले आहे.