नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली. त्यामुळे मुकेश याला फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मुकेशने केलेल्या दया याचिकेमुळे फाशीची शिक्षा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. निर्भयाच्या चारही दोषींना २२ जानेवारीऐवजी आता १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फासावर चढविले जाणार आहे, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले होते. मात्र हायकोर्टाने नवीन डेथ वॉरंटला दोषी पवन गुप्ताने सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय पवनने दाखल केलेल्या स्पेशल लिव्ह पिटिशनवर (विशेष रजा याचिका) २० जानेवारीला सुनावणी घेणार आहे.
अनेकदा दोषींना मिळालेल्या कायदेशीर तरतुदींचा अवलंब करत हे चारही दोषी फाशीची शिक्षा लांबणीवर जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अलीकडेच दोषी मुकेशने दया याचिका सादर केली होती. त्यामुळे २२ जानेवारीला दिली जाणारी फाशीची शिक्षा लांबणीवर गेली. पुन्हा दिल्ली कोर्टाने नवीन डेथ वॉरंट काढत नवीन तारीख म्हणजेच १ फेब्रुवारी निश्चित केली असताना आता दोषी पवनने सर्वोच्च न्यायालयात दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान केले आहे. याआधी हायकोर्टाने पवन अल्पवयीन असल्याचा त्याचा दावा फेटाळला होता.
निर्भयाच्या आईनं दोषींना माफ करावं, ज्येष्ठ वकिलाचा अजब सल्ला
गुरुवारी रात्री केंद्रीय गृह मंत्रालयाने मुकेशची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली होती. मात्र, आज राष्ट्रपतींना ही याचिका फेटाळली. त्यानंतर चौघांच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात आली आहे होती. निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना पटियाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, ही फाशी पुन्हा लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी आपले सर्व उपाय अवलंबत आहेत. पवनने दिलेल्या कोर्टाच्या आदेशाला आव्हानामुळे आता या प्रकरणातील विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार या चार दोषींना १ फेब्रुवारीला फाशी होणार की नाही यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.