नवी दिल्ली - २०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा दिल्ली कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत टळली आहे. त्यानंतर पीडित मुलीची आई आशा देवी यांना दोषींचे वकिल ए.पी. सिंग यांनी दोषींना कधीच फाशी दिली जाणार नाही असे आव्हान दिले असल्याचा गौप्यस्फोट आशा देवी यांनी आज केला आहे. पुढे त्या म्हणाल्या, मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे. सरकारला दोषींना फाशी द्यावीच लागेल.
Nirbhaya Case : तारीख पे तारीख! निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली
निर्भयाच्या आईनं दोषींना माफ करावं, ज्येष्ठ वकिलाचा अजब सल्ला
निर्भया प्रकरण : दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळलीइंदिरा जयसिंह म्हणाल्या होत्या की, "मी आशा देवी यांचे दु:ख समजते. तरी सुद्धा मी त्यांना सांगेन की, सोनिया गांधी यांनी आपण मृत्यूदंडाच्या विरोधात आहे, असे सांगत राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील दोषी नलिनीला माफ केले होते. तसेच, निर्भयाच्या आईने केले पाहिजे. आम्ही आपल्या (निर्भयाची आई)सोबत आहेत. मात्र, मृत्युदंडाच्या विरोधात आहोत." या वक्तव्याने आशा देवी यांनी यांना दुःख झाले होते. ‘निर्भया’च्या आई-वडिलांनी संताप व्यक्त केला. असे बोलण्याची जयसिंग यांची हिंमतच कशी झाली, असा सवाल ‘निर्भया’च्या आईने केला, तर असे म्हणताना जयसिंग यांना लाज वाटायला हवी, असा संताप तिच्या वडिलांनी व्यक्त केला होता.