मेरठ - पूर्वजांचा वारसा म्हणून कोणाला संपत्ती मिळते तर कोणाला चांगले संस्कार मिळतात. उत्तर प्रदेशातील मेरठ या शहरातील एका व्यक्तीला वारसा म्हणून घराण्याचे परंपरेने चालत आलेले 'जल्लाद'चे काम मिळाले आहे. अशी चर्चा आहे की, याच कुटुंबातील पवन जल्लादची ही चौथी पिढी तिहार तुरुंगात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशी दिली आहे. 20 मार्चला पहाटे ५.३० वाजता या चौघांना फासावर लटकवले आहे. यासाठी पवन जल्लाद डमीला फासावर चढविण्यासाठी २ दिवस आधी तिहार तुरुंगात हजर झाला होता. संपूर्ण जगात कोरोनाची पसरणारी दहशत पाहता त्यावेळी जल्लादाची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर यशस्वीपणे डमीला फासाच्या तख्तावर चढविण्यात आले.
भारत देशात या कुटुंबातल्या लोकांना जल्लादांचं कुटुंब म्हणून ओळखले जाते. १९५० - ६० च्या दशकात या कुटुंबातील पहिल्या पिढीचे प्रमुख लक्ष्मण हे देशातील दोषींना फाशी देण्याचं काम करत होते. आता त्यांचा पणतू म्हणजेच लक्ष्मण यांचा मुलगा कालू राम जल्लाद यांच्या मुलाचा मुलगा पवन जल्लाद म्हणजेच या कुटुंबाची चौथी पिढी आयुष्यातली पहिली फाशी देण्याची तयारी करण्यात व्यस्त आहे.पाच दोषींच्या फाशीसाठी आजोबांना केली होती मदतपवन जल्लादने याआधी जवळपास पाच फाशींमध्ये आजोबा कालू राम जल्लाद यांची मदत केली होती. त्या पाच फाशींच्या वेळी पवन यांनी फाशी देण्याच्या प्रक्रियेतले सर्व बारकावे आजोबा कालू राम यांच्याकडून शिकून घेतले होते. आता निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकवणं हा पवन जल्लादसाठी पहिलाच अनुभव असणार आहे.फाशीसाठी वापरलेल्या दोराचं नंतर काय केलं जातं? याबाबत असलेली अंधश्रद्धा वाचून व्हाल अवाक्...
हा माझ्या पूर्वजांचा आशीर्वादपवन जल्लाद म्हणाले की, 'मी निर्भयाच्या दोषींना फासावर फासावर चढविण्यासाठी तयार होतो. हा माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे. पूर्वजांनी आयुष्यात एका वेळीच एका किंवा दोन दोषींना फाशी दिली होती. मी माझ्या आयुष्यात पहिल्याच वेळी एकत्र चार-चार दोषींना फासावर लटकवले आहे.'
Nirbhaya Case: सॅल्यूट! संयमाची 'सीमा' ढळू न देता न्यायालयात लढली; देशाची वाहवा मिळवली