नवी दिल्ली - २०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या चौघांना आज सकाळी फाशी देण्यात आली. मध्यरात्री पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेबाबत पुनर्विचार करण्यासाठी एका दोषीने दाखल केलेली याचिका शेवटच्या मिनिटाची फेटाळली. निर्भयाच्या दोषींना फासावर चढवल्यानंतर राजकीय स्थरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यानंतर ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. तसेच खासदार हेमा मालिनी यांनी देखील निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यानंतर न्याय मिळायला वेळ लागला. मात्र, उशीरा का होईना पण चांगली गोष्ट घडली आणि दोषींना फासावर चढवले. देशभरातील सर्व महिलांना आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच या फाशीच्या शिक्षेमुळे यापुढे आता गुन्हेगार महिलांविरोधात गुन्हे करण्यास घाबरतील असा विश्वास हेमा मालिनी यांनी व्यक्त केली.
Nirbhaya Case : यापुढे महिलांवर अत्याचार करण्यास नराधम घाबरतील, खा. हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 18:25 IST
Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यानंतर न्याय मिळायला वेळ लागला.
Nirbhaya Case : यापुढे महिलांवर अत्याचार करण्यास नराधम घाबरतील, खा. हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया
ठळक मुद्देया फाशीच्या शिक्षेमुळे यापुढे आता गुन्हेगार महिलांविरोधात गुन्हे करण्यास घाबरतील असा विश्वास हेमा मालिनी यांनी व्यक्त केली.