नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कारातील चार दोषींच्या डमीला बुधवारी सकाळी तिहार कारागृहात फाशी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. जल्लाद पवनने हा प्रयत्न केला. काल मंगळवारी तिहार कारागृहात पोहोचलेल्या पवन जल्लादला देखील कोरोनाचा पार्श्वभूमीवर वैद्यकीय चाचण्या कराव्या लागल्या. कारागृहात पवन जल्लादची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात आली, तसेच शारीरिक तपासणी केली गेली.
आज पहाटे साडेपाच वाजता चौघांच्या डमीला फाशीवर लटकविण्याचा प्रयत्न केला. जो यशस्वी झाला आहे. या चारही दोषींना 20 मार्च रोजी पहाटे साडेपाच तिहारमध्ये फाशी देण्यात येणार आहे. त्याची ही पूर्वतयारी आहे.
Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीच्या पत्नीने घटस्फोटासाठी घेतली कोर्टात धाव
Nirbhaya Case : सात वर्षांनी आठवले, निर्भयावर बलात्कारावेळी राजस्थानात होतो; दोषीचा दावा फेटाळला
Nirbhaya Case : अखेर दोषींनी ठोठावला आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दरवाजा
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीचे अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यातच फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता या दोषींनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. तर दोषी मुकेशची मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली कोर्टाने फेटाळली आहे. तर दोषी अक्षयच्या पत्नीने बिहारच्या कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.