मेरठ - निर्भयाच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशी दिल्यामुळे संपूर्ण देश आज आनंदी आहे. चौघांना फाशी तख्तावर चढवणारा पवन जल्लाद देखील तितकाच आनंदी आहे. निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यानंतर पवन जल्लाद आता आपल्या मुलीचं लग्न लावून देणार आहे. तो या दोषींना फाशी देण्याची आतुरतेने वाट पाहत होता. पवन जल्लाद म्हणाला की, फाशी दिल्यावर त्याला 2 लाख रुपये मिळतील. या पैशातून तो आपल्या मुलीचे हात पिवळे करणार आहे.
Nirbhaya Case : निर्भयाचा तो मित्र, एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे परदेशातशुक्रवारी सकाळी फाशी दिलीपवन जल्लादला फाशी दिल्याच्या बदल्यात प्रत्येक फाशीचे ५० हजार रुपये मिळतील असे सांगण्यात आले होते. पवनने एकत्र चार दोषींना फासावर चढवले हे जगासह देशातील एकमेव प्रकरण ठरले आहे. ज्यांनी चार दोषींना फाशी दिली आहे. त्याचे नाव इतिहासात लिहिले जाईल. पहाटे साडेपाच वाजता या चारही दोषींना फाशी देण्यात आली. पवन जल्लादच्या कुटुंबात नऊ सदस्य आहेत. त्यांना सात मुले आहेत. त्यापैकी पाच मुली आणि दोन मुलगे आहेत. त्याचे चार मुलींची लग्न झाली आहेत. पाचव्या मुलीचे लग्न पवन जल्लाद फाशीच्या मिळणाऱ्या पैशातून लग्न लावून देणार आहे. एक मुलगी आणि दोन मुलांची लग्न अद्याप बाकी आहे. पवनने निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी दिल्यामुळे मुलेही आनंदी आहेत.
Nirbhaya Case : 6 नराधमांनी बलात्कार केला होता; चौघांनाची ‘का’ फाशी दिली?
Nirbhaya Case : शुभदिन! न्याय मिळाला, विश्वास वाढला; तब्बल तीन महिन्यांनी अण्णा हजारेंनी सोडलं मौन
Nirbhaya Case : राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यकाळातील पहिलाच मृत्युदंडहा व्यवसाय चार पिढ्यांपासून चालू आहेमेरठ येथील रहिवासी पवन कुमार यांचे कुटुंब चार पिढ्यांपासून हे काम पाहत आहे. वडील मम्मू यांनी आतापर्यंत अनेक दोषींना फाशी दिली आहे, तर आजोबा काळूराम यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा खूनी सतवंत सिंह आणि केहर सिंह यांना फाशी दिली आहे. याशिवाय रंगा आणि बिल्ला यांनाही काळूरामांनी फाशी दिली. पण पवन जल्लादने कालपर्यंत एकाही दोषीला फाशी दिलेली नव्हती. मात्र आज त्याने पहिल्यांदा चार दोषींना एकत्र फाशी दिली.पगारामध्ये दोन हजार रुपये वाढलेपवन कुमार (५६) हे मेरठच्या कांशीराम निवासी कॉलनीत राहतात. त्याचे खरे नाव सिंधी राम आहे. पवन कुमार ज्या घरात राहतात त्या घरात आजूबाजूला देवाची छायाचित्रे आहेत. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी पवन कुमार बराच काळ तयारी करत होता. तिहार जेल प्रशासनाने आधीच मेरठ जेल प्रशासनाला पत्र पाठविले होते. गेल्या तीन दिवसांनंतर आणखी एक पत्र आले, त्यानंतर पवनला दिल्ली तिहार तुरुंगात पाठविण्यात आले. पवन म्हणाले की, गेल्या वर्षी त्यांनी सरकारला दरमहा वीस हजार रुपये पगार देण्यास सांगितले होते, परंतु सरकारने केवळ दोन हजार रुपये वाढविले. आता त्यांना महिन्याला पाच हजार रुपये मिळतात. या पैशात उदरनिर्वाह करणं खूप अवघड होतं.