नवी दिल्ली - फाशीची भीती बाळगणार्या निर्भयाच्या चारही दोषींचे सर्व कायदेशीर पर्याय संपल्यानंतरही हार मानण्यास तयार नाहीत. दोषी पवन गुप्ता बुधवारी दुपारी पुन्हा एकदा कोर्टात धाव घेतली आहे. यावेळी पवनने मंडोली जेलमधील पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे.या दोन पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पवनने दिल्ली कोर्टात धाव घेतली आहे. पवनचे म्हणणे आहे की, मंडोली कारागृहातील दोन पोलिसांनी त्याला मारहाण केली आणि डोक्याला गंभीर इजा झाली. याप्रकरणी कोर्टाने जेल प्रशासनाला जाब विचारण्यासाठी नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज होणार आहे.याआधी दोषी विनय शर्मा यांनी सोमवारी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे फाशीची शिक्षा बदलून जन्मठेपात बदल करण्याची विनंती केली होती. विनय शर्माचे वकील ए.पी. सिंग यांनी दिलासा मिळावा म्हणून कलम ४३२ आणि ४३३ अन्वये बैजलकडे याचिका दाखल केली होती. याचिकेत विनय यांनी म्हटले आहे की, फाशी देण्यात येऊ नये कारण हे दुर्मिळ प्रकरणात निर्दोष ठरले आहे. या प्रकरणात आजीवन कैदेचा पर्याय निर्विवादपणे नाकारला गेला आहे. विनयच्या वागण्यात बदल, तरुण वय आणि कुटुंबाची कमकुवत सामाजिक व आर्थिक स्थिती पाहून त्यांना दिलासा मिळाला पाहिजे असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
Nirbhaya Case : फाशी नको, आजीवन कारावास द्या, निर्भयाच्या 'या' दोषीची उपराज्यपालांकडे विनवणी
Nirbhaya Case : जुन्या वकिलावर फोडले चुकीचे खापर; या दोषीने पुन्हा केली क्युरेटिव्ह याचिका दाखल
Nirbhaya Case : अखेरचा डेथ वॉरंट जारी होताच दोषींची दातखिळी बसली, रात्रही संपता संपेना
Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींना 20 मार्चला फासावर लटकवणार, नव्याने डेथ वॉरंट जारीया खटल्यात फिर्यादीच्या वतीने ५ मार्चला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. राणा यांनी नवीन डेथ वॉरंट जारी केल्याची माहिती दिली. या वॉरंटनुसार २० मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजता दोषींना फाशी देण्यात येणार आहे.