नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय कुमार शर्माने सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. राष्ट्रपतींनी दोषी विनयची दया याचिका फेटाळली होती. याला आव्हान देण्यासाठी विनयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रिट याचिका दाखल केली आहे.
Nirbhaya Case : आता विनयने केला दयेचा अर्ज; पुन्हा फाशीच्या शिक्षेची तारीख लांबणीवर जाणार?
Nirbhaya Case : दोषी विनयने तुरुंगात केला आत्महत्येचा प्रयत्न
Nirbhaya Case : विनयनंतर आता दोषी अक्षयने दाखल केली दया याचिका
Nirbhaya Case : विनयची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली; तिहार जेलची कोर्टात फाशीच्या तारखेसाठी धाव
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींपैकी एक विनय कुमार शर्माची दया याचिका राष्ट्रपतींनी १ फेब्रुवारीला फेटाळली होती. अलीकडेच त्याची क्युरेटिव्ह याचिका यापूर्वीच फेटाळून लावण्यात आली आहे. मुकेश याची दया याचिका १७ जानेवारीला राष्ट्रपतींनी फेटाळून लावली होती. १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेतील दोषी विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंग आणि अक्षयसिंग ठाकूर यांना दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.