नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींपैकी एक विनय कुमार शर्माची दया याचिका राष्ट्रपतींनी आज फेटाळली आहे. त्यामुळे तो फाशीच्या जवळ आला आहे. क्युरेटिव्ह याचिका यापूर्वीच फेटाळून लावण्यात आली आहे. मुकेश याची दया याचिका १७ जानेवारीला राष्ट्रपतींनी फेटाळून लावली आहे. परंतु, दोषींना कधी फाशी दिली जाईल याबाबत अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. त्यामुळे आता विनयची दया याचिका फेटाळल्यानंतर तिहार तुरुंग प्रशासनाने पटियाला हाऊस कोर्टात निर्भयाच्या चार दोषींच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात धाव घेतली आहे.
Nirbhaya Case : तारीख पे तारीख! निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली
Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिला दणका; याचिका फेटाळलीया गुन्ह्याच्या वेळी म्हणजेच १६ डिसेंबर २०१२ मध्ये पवन हा अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. तथापि, हा दावा खालच्या कोर्टापासून सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आला आहे. परंतु हा दावा फेटाळून लावण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरूद्ध त्याने आता ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पवन याने शुक्रवारी याचिका दाखल केली होती आणि तातडीने या प्रकरणाचा विचार करून सुनावणी घेऊन सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.न्या. आर. भानुमति, अशोक भूषण आणि ए.एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने पुनर्विचार याचिका व त्यासमवेत दाखल केलेल्या कागदपत्रांची काळजीपूर्वक पाहणी करून त्यांनी याचिका फेटाळून लावली. पवन गुप्ता हा दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींपैकी एक आहे. बलात्कार आणि हत्येप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पवनच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला आव्हान देणारी त्याची पुनर्विचार याचिका यापूर्वीच फेटाळली आहे. परंतु पवन याने अद्याप सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केलेली नाही किंवा राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली नाही. त्यामुळे त्याच्याकडे फाशीची शिक्षा टाळण्यासाठी दोन कायदेशीर पर्याय आहेत.