नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींच्या कुटुंबीयांनी दोषींचे मृतदेह ताब्यात न घेतल्यास सरकार अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती तिहार तुरूंगाचे डीजी संदीप गोयल यांनी दिली आहे. रात्रीच्या वेळी मुकेश आणि विनयनं जेवण घेतलं. तर अक्षयनं केवळ चहा घेतला. ते चौघही जण शांत होते. तसंच न्यायालयाकडून काही आदेश आले आहेत का याची माहिती घेत होते, असंही त्यांनी सांगितले. फाशीआधी चारही दोषींना शेवटची इच्छा विचारण्यात आली. मात्र, त्यांनी कोणतीही इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. नंतर निर्भया प्रकरणातील दोषींना आज पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. त्यांतर सकाळी चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी डीडीयू रूग्णालयात नेण्यात आल्याची माहिती तिहार तुरूंगाचे डीजी संदीप गोयल यांनी दिली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी त्यांचे नातेवाईक देखील रुग्णालयात दाखल झाले. दोषी अक्षय कुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह या चार दोषींना पहाटे ५.३० वाजता दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली. डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया नावाच्या २३ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार आणि तिचा खून केल्याबद्दल चौघांना दोषी ठरविण्यात आले होते.