नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील फाशीच्या तीन दोषींनी १ फेब्रुवारीला दिल्या जाणाऱ्या फाशीला स्थगिती मिळावी म्हणून कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवरील आदेश दिल्ली कोर्टाने राखून ठेवला असून तिहार तुरुंग प्रशासनाने आज शुक्रवारी दिल्ली कोर्टात आव्हान दाखल केले. आजच थोड्या वेळानंतर कोर्ट या याचिकेवर निर्णय देणार आहे. त्यामुळे उद्या दोषींना फासावर लटकवणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
Nirbhaya Case: 'त्या' एकाला सोडून बाकीच्यांना उद्या फाशी देता येईल; तिहार जेल 'तय्यार'
या दोषींच्या फाशीच्या स्थगिती याचिकेला विरोध करत तुरुंग प्रशासनाने अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. धर्मेंदर राणा यांनी सांगितले की, २०१२ निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील एका दोषींची दया याचिका प्रलंबित असून उर्वरित तीन दोषींना डेथ वॉरंटने दिलेल्या तारीख आणि वेळेनुसार फासावर लटकवू शकतो. सरकारी वकील इरफान अहमद हे आज तिहार तुरुंग प्रशासनाच्या वतीने कोर्टात हजर आहेत. त्यांनी विनय शर्मा या एका दोषींची दया याचिका प्रलंबित असून उर्वरित तीन दोषींना फाशी दिली जाऊ शकते. यात काहीही बेकायदेशीर बाब नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले. त्यामुळे आता दिल्ली कोर्ट आज काय निर्णय देणार यावर उद्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अवलंबून आहे.