नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील चार आरोपींना फाशी देण्याची तारीख आज जाहीर केली जाऊ शकते. २०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या पालकांच्या याचिकेवर दिल्लीचे कोर्टाने आज निकाल देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषी ठरलेल्या ४ जणांना फाशी देण्याची प्रक्रिया त्वरेने करावी व त्यांच्याविरूद्ध मृत्यूदंड वॉरंट काढण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात निर्भयाच्या आई-वडिलांच्या याचिकेवर आज दुपारी निर्णय देण्याची शक्यता आहे.
Nirbhaya Gang Rape Case : आम्ही कोर्टाच्या आदेशाची वाट पाहतोय - आशा देवी
निर्भया सामूहिक बलात्कारात या चारही दोषींना फाशी द्या अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. यासह चौघांविरूद्ध मृत्यूदंड वॉरंट बजावण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पटियाला हाऊस कोर्टात निर्भयाचे आई - वडील आणि पवन, विनय आणि अक्षय या दोषींचे वकील एपी सिंह तसेच चौथा दोषी मुकेशची बाजू मांडण्यासाठी वकील एम. एल. शर्मा हजर झाले आहेत.असा केला न्यायालयात युक्तिवाद सादरप्रतिवादी - क्यूरेटिव याचिका दाखल करण्यासाठी आम्हाला वेळ द्या.न्यायाधीश- जेल प्रशासनाचे काय उत्तर आहे?सरकारी वकील- जेल प्रशासनाचे म्हणणे आहे की, नोटीस कालावधीत कोणतीही याचिका दाखल केली गेली नव्हती आणि कोर्टात कोणतीही याचिका प्रलंबित नाही.वकील शर्मा म्हणाले - मी मुकेशचा वकील आहे. मी संध्याकाळपर्यंत वकालतनामा दाखल करेन.न्यायाधीश - त्याचा वकील आधीपासूनच न्यायालयात आहे.वकील शर्मा- जर संध्याकाळपर्यंत वकालतनामा दाखल केला नाही तर मी या प्रकरणातून बाहेर जाणार आहे.मुकेश यांचे वकील म्हणाले - शर्मा यांनी तुरुंगात मुकेशला भेटलेलं नाही तर मग तो त्यांचा वकील कसा असू शकतो.सरकारी वकील - दोषींसाठी कोणतीही याचिका प्रलंबित नाही, म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी.सरकारी वकील - ही याचिका २०१८ पासून प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत बचाव पक्ष त्यांना बचाव करण्याची संधी मिळाला नाही असे म्हणू शकत नाही. आता हे वकील अचानक जागे झाले आणि म्हणतात की, क्यूरेटिव याचिका दाखल करावी लागेल. त्यांना खटला लांबवायचा आहे. दरम्यान, न्यायाधीशांनी वकील एम. एल. शर्मा यांना फटकारले.