मेरठ - संपूर्ण देशात खळबळ माजविणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेतील चार आरोपींना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फासावर चढविले जाणार असल्याचा निर्णय काल मंगळवारी नवी दिल्लीतील पटियाला कोर्टाने दिला आहे. पटियाला कोर्टाने मंगळवारी डेथ वॉरंट जारी केले आहे. तिहार कारागृह प्रशासनाने उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालकांना फासावर चढवण्यासाठी जल्लादला तयार ठेवण्यास सांगितले आहे. मेरठ येथील जल्लाद पावन यांनी यावर म्हटले आहे की, मी पाच मुलींचा बाप असल्याकारणाने मला या नराधमांना फासावर चढविण्यास द्या. त्यामुळे मला शांती मिळेल. त्या पीडित मुलीच्या कुटुंबियांना देखील शांती मिळेल.
पवन गुप्ता (२४), विनय शर्मा (२५) , मुकेश सिंग (३२) आणि अक्षय कुमार सिंग (३३) या चौघांविरुद्ध फाशीसाठीचे ‘डेथ वॉरंट’ जारी केले. त्यानुसार येत्या २२ जानेवारीस सकाळी ७ वाजता तिहार कारागृहात त्यांना फाशी दिली जाणार आहे. जल्लाद पवन यांनी या चारही दोषींना फाशी देणार असल्याची माहिती मला मिळाली आहे. जर मला चौघांना फासाच्या तख्तावर चढविण्यासाठी बोलावले, तर मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे. जसा मला सरकारकडून आदेश मिळतील तसा मी दिल्लीला नराधमांना फासावर चढविण्यास रवाना होईन.
Nirbhaya Case : अखेर निर्भयाच्या गुन्हेगारांच्या मृत्युदंडाची वेळ ठरली, 22 जानेवारीला लटकवणार फासावर
तिहार कारागृह प्रशासनाने काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून जल्लाद तयार ठेवण्यास सांगितले. उत्तर प्रदेशात दोन जल्लाद आहेत. एन लखनऊ तर दुसरा मेरठ येथे राहतो. लखनऊ येथील जल्लादची तब्येत ठीक नसल्याने जल्लाद पवनला तयार राहण्यास सांगितले होते. याबाबत तोंडी माहिती पवन यांना देण्यात आली होती. त्यानंतर कोणतीही सूचना देण्यात आली नाही. आता मला जशी सूचना मिळेल तसा मी दिल्लीला पोहचेन. फाशी देताच प्रथम मानेचे हाड तुटते, मेंदू सुन्न होतोफाशी देणारा पवन म्हणाला की, ज्या कैद्याला फाशी देण्यात येते, त्याला अर्ध्या तासापूर्वी पोलिसांच्या सुरक्षेच्या ताफ्यातून फाशीघराजवळ आणण्यात येते. फाशीच्या तख्तावर चढल्यानंतर त्याचे दोन्ही हात व पाय बांधले जातात. फाशी देणाऱ्यास काळ्या रंगाचा मुखवटा घातला जातो आणि त्याच्या गळ्याभोवती फास लावतात. ठराविक वेळ होताच वॉच पॉईंट पाहणारे अधिकारी रुमाल हलवून फाशी देण्यासाठी इशारा देतात. इशारा मिळताच फाशी देणारा जल्लाद फाशी देतो.कारागृह प्रशासन नातेवाईक नसतील तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात
त्यानंतर लाकडी प्लॅटफॉर्म दोन भाग होऊन खालच्या दिशेने जातात आणि टांगलेला कैदी एकाच झटक्याने हवेत तरंगू लागतो. धक्का त्याच्या गळ्याला बसतो, त्यावेळी त्याच्या मानेच्या हाडाचा आवाजही ऐकू येतो. ३० मिनिटांपर्यंत फासावर टांगल्यानंतर मृतदेह खाली घेतला जातो. तिथे उपस्थित डॉक्टर त्याची चाचणी घेतल्यानंतर मृत्यूची घोषणा करतो. यानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर मृतदेह कुटुंबास देण्यात येतो. जर कुटूंबातील लोक मृतदेह घेण्यासाठी पोहोचले नसतील तर तुरूंग प्रशासन कैद्याच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करतात.