नवी दिल्ली - निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. कनिष्ठ न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर पवन आणि मुकेश या दोन आरोपींनी फाशीपासून बचाव व्हावा यासाठी अखेरचा मार्ग पत्करून सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज दुपारी फेटाळली आहे. त्यावेळी निर्भयाची आई आशा देवी यांनी गेल्या सात वर्षापासून मी न्यायासाठी संघर्ष करत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी मोठा असून २२ जानेवारीला ज्यादिवशी आरोपींना फासावर लटविणार तो दिवस देखील खूप मोठा असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Nirbhaya Case : फाशी निश्चित! क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
सर्वोच्च न्यायालयाने क्यूरेटिव्ह याचिका फेटाळल्याने विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांच्यासह चारही आरोपींना 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता फाशी देण्यात येईल. याअगोदर 7 जानेवारी रोजी पटियाला न्यायालयाकडून चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंटजारी करण्यात आला होता. विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह याने फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. दाखल केलेल्या याचिकांमुळे आणि दाखल होणाऱ्या याचिकांमुळे 22 तारखेला दोषींना फासावर लटकावले जाईल का याबाबत साशंका निर्माण झाले होते. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने पवन आणि मुकेशची क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्याने आरोपींची फाशी निश्चित झाली आहे.