छत्तीसगडमधील रायपूरमध्ये राहणारा ३१ वर्षीय रवी पुजारी, गेल्या आठ वर्षांपासून फेसबुकवर निशा जिंदल नावाने वावरत होता. १० त्याला फॉलो करत होते. फेसबुकवर गेल्या आठ वर्षांपासून मुलगा असून मुलगी असल्याचे भासवणाऱ्या या तरुणाला पोलिसांनीअटक केली आहे. लोकांना सत्य घटना कळावी म्हणून पोलिस कोठडीत आणताच त्याला पोलिसांनी, मी पोलिस कोठडीत आहे. मीच निशा जिंदल आहे, अशाप्रकारची पोस्टही करायला सांगितली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही आयएएस, आयपीएस अधिकारी देखील त्याला फॉलो करत होते. गेल्या 11 वर्षांपासून अभियांत्रिकेच्या परिक्षेत नापास होणारा ३१ वर्षीय रवी पुजारी गेल्या २०१२ पासून फेसबुकवर निशा जिंदल आणि पाकिस्तानी अभिनेत्री मिराह पाशा नावाने फेक फेसबुक अकाउंट ओपन केले होते. अटक आरोपी रवी निशा जिंदल नावाच्या महिलेच्या नावे फेक फेसबुक अकाउंट करून सातत्याने जातीय संदेश पोस्ट करत असून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडे येत होत्या.
पोलिसांनी त्या फेक फेसबुक आयडीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. १० दिवस लक्ष ठेवल्यानंतर पुजारीला ताब्यात घेण्यात आले. आरोपी एक पोस्ट केल्यानंतर मोबाइल बंद करायचा, त्यामुळे पोलिसांना त्याचं लोकेशन ट्रेस करणं अवघड गेलं. पुजारीने २००९ साली त्याने एका स्थानिक खासगी कॉलेजमध्ये इंजीनिअरिंगसाठी प्रवेश घेतला, मात्र अद्याप त्याला डिग्री मिळू शकली नाही. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर त्याच्याकडून मीच निशा जिंदल आहे अशी पोस्ट त्याच्या फॉलोअर्स यांना सत्य परिस्थिती कळावी म्हणून जाणूनबुजून करायला सांगितली.
निशा जिंदल या फेक फेसबुक आयडीवरुन रवी कधी मोठ्या अधिकाऱ्याप्रमाणे पोस्ट करत असे. तर, कधी मोठ्या संस्थेत उच्च पदावर कार्यरत असल्याचा दावा करायचा. कधी मी आता ३५ वर्षांची झाली असून अजून सिंगल आहे अशाप्रकारच्या पोस्ट पुरुषांना आकर्षित करण्यासाठीही करायचा. सध्या त्याच्या आयडीचे डिटेल्स घेतले जात आहेत. त्याने ब्लॅकमेल करुन पैसे कमावलेत का याचा सध्या तपास करत आहेत.