आमदार नितेश राणे यांची गाडी अडवल्यामुळे पोलीस आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी निलेश राणे यांनी आक्रमक बनत पोलिसांशी हुज्जत घातली. नितेश राणे हे स्थानिक आमदार आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या अधिकाराखाली त्यांना अडवला आहात, असा सवालही त्यांनी पोलिसांना केला. मात्र, आज या प्रकरणात उलट चित्र पाहायला मिळत आहे. नितेश राणे यांचा उच्च न्यायालयासमोरील जामीन अर्ज एका निवेदनासह मागे घेण्यात आला आहे. या निवेदनात नितेश राणे पोलिसांच्या चौकशीला शरण जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाकडून १० दिवसांचे अटकेपासून संरक्षण मिळाले होते. आणखी 5 दिवसांचे संरक्षण शिल्लक असतानाही नितेश राणे तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.
पोलिसांची दादागिरी सुरु आहे. त्यांना कोर्टाचा अवमान करू दे, आम्ही सुप्रीम कोर्टात पाहू असं नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या भाजपाचे आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टापाठोपाठ आता सिंधुदुर्ग सत्र न्यायलायानं दणका दिला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.
Video : अरे नको ना निलेश, त्या वकिलांना बोलूदे ना; आमदार नितेश राणेंचा व्हिडीओ व्हायरल
आमदार नितेश राणे यांची काल सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर गाडी अडवल्यामुळे पोलीस आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी निलेश राणे यांनी आक्रमक बनत पोलिसांशी हुज्जत घातली. त्यावेळी नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांची यांनी आपल्या भावाला म्हणजेच निलेशला बोलण्यास अटकाव करून वकिलांना बोलू दे असं सांगत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांवर काल, मंगळवारी रात्री उशिरा ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल