शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

'बाबा, तुमच्या राज्यात कुणीच आनंदी राहू शकत नाही'; फॅशन डिझायनरची ११ व्या मजल्यावरुन उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 6:59 PM

आयुषी नोएडा येथील गौरव स्टुडिओमध्ये फॅशन डिझायनर म्हणून काम करत होती. समोर आलेल्या माहितीनुसार आयुषीच्या कंपनीनं नुकताच अभिनेत्री करिना कपूरसाठीही ड्रेस डिझाइन केला होता. 

गाझियाबाद-

गाझियाबादमधील राजगर एक्स्टेंशनमध्ये एका फॅशन डिझायनरनं इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आयुषी दीक्षित असं असून घटना घडली त्यावेळी फ्लॅटमध्ये तिची आई देखील होती. आयुषीजवळ पोलिसांना एक सुसाइट नोट देखील सापडली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. 

नंद्रगाम परिसरातील राजनगर एक्स्टेंशनमधील सृष्टी सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. मेरठच्या कंकर खेडाचे रहिवासी असलेले सतीष दीक्षित यांचं कुटुंब सृष्टी सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ११०१ मध्ये वास्तव्याला आहे. सतीष दीक्षित यांची मेरठ येथे स्वत:ची फॅक्ट्री आहे. तर त्यांची मुलगी आयुषी नोएडा येथील गौरव स्टुडिओमध्ये फॅशन डिझायनर म्हणून काम करत होती. समोर आलेल्या माहितीनुसार आयुषीच्या कंपनीनं नुकताच अभिनेत्री करिना कपूरसाठीही ड्रेस डिझाइन केला होता. 

२५ वर्षीय आयुषी सोमवारी रात्री ८ वाजच्या सुमारास तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये आली आणि तिथं खुर्चीवर उभं राहून बाल्कनीच्या रेलिंगवर चढून इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. जोरात आवाज झाल्यानं इमारतीचा वॉचमन घटनास्थळावर धावत पोहोचला आणि आयुषीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यानंतर त्यांना आरडाओरडा करत सर्वांना बोलावला. आयुषीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचार करण्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 

सुसाईड नोटमध्ये काय सापडलं?पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. यात आयुषीनं नोकरीच्या तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे. यासोबतच तिनं जे लक्ष्य गाठायचं होतं त्यात अपयश येत असल्याचंही म्हटलं आहे. तसंच तिनं आपल्या वडीलांचाही उल्लेख केला आहे. "बाबा तुमच्या राज्यात कुणी कधीच आनंदी राहू शकत नाही", असं तिनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं असून पोलिसांनी आता चौकशीला सुरुवात केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKareena Kapoorकरिना कपूर