उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये राहणाऱ्या एका तरूणीने पोलिसात तक्रार दिली होती की, तिचे खाजगी फोटो लीक केले जात आहेत. असं कोण करत आहे हे मात्र तिला माहीत नव्हतं. त्यामुळे सेक्टर २० मधील अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोएडामध्ये एक PG मध्ये राहणारी विद्यार्थीनी म्हणाली की, कुणीतरी तिचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल करून तिचं करिअर खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. तिने पोलिसांना सांगितले की, कुणीतरी तिचा मोबाइल फोन हॅक केलाय. ज्याद्वारे कुणालातरी तिचे सर्व फोटो आणि व्हिडीओज मिळाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस अधिकारी मुनीष चौहान म्हणाले की, सेक्टर २० मध्ये पीजीमध्ये राहणाऱ्या तरूणीने मंगळवारी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. तथ्य समोर आले की, कारवाई केली जाईल.
ही बातमी वाचल्यावर तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल की, फोन प्रोटेक्ट करणं किती गरजेचं आहे. कारण गरजेचं नाही तर की, तुमचा फोन हॅक करण्यासाठी दुसऱ्याच्या हातातच दिला पाहिजे. आता तर ऑनलाइनच लोक फोन, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप सहजपणे हॅक करू शकतात. यासाठी बचाव गरजेचा आहे.
फोन हॅक होऊ नये म्हणून काही टिप्स
१) अपडेट करत रहा फोन
थोड्या थोड्या दिवसांनी तुम्ही तुमचा फोन अपडेट केला पाहिजे. याने हॅकर्सना तुमची खाजगी माहिती मिळवण्याी संधी मिळत नाही. त्यासोबतच जेव्हा तुम्ही फोन अपडेट करता तेव्हा Android Security Patch सोबतच तुम्हाला बरेच सिक्युरिटी फीचर्स मिळतात.
२) Third Party अॅप डाउनलोड करू नका
या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे की, थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करणं टाळलं पाहिजे. अनेकदा मेसेजमध्ये अॅप डाउनलोडच्या लिंक येतात. किंवा सोशल मीडियातून लिंक येतात. जर विश्वास असलेला सोर्स नसेल तर लिंकवर क्लीक करू नका.
३) एसएमएसऐवजी मेसेजिंग अॅपचा करा वापर
तुम्ही तुमच्या फोनमद्ये SMS पाठवण्यासाठी देण्यात आलेल्या मेसेज प्लॅटफॉर्मचा वापर करू नये. याने प्रायव्हेट डिटेल्स लीक होण्याचा धोका राहतो. अशात एक्सपर्ट सल्ला देतात की, एखादं मेसेजिंग अॅप डाउनलोड करून त्याचा वापर करा. यात सिक्युरिटीचे अनेक फीचर्स मिळतात.