Noida Crime News : नोएडाच्या एका पोलीस स्टेशनमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाने येऊन आपल्या पत्नी विरोधात तक्रार दाखल केली आहे. तरूणाने त्याच्या पत्नीच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितलं की, त्याची पत्नी साध्याभोळ्या लोकांना आपल्या हनीट्रॅपमध्ये फसवते आणि ब्लॅकमेल करून त्यांना पैसे मागते. इतकंच नाही तर आतापर्यंत तिने अनेक लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं आहे.
सहमतीने ठेवले शारीरिक संबंध आणि मग...
गौतम बुद्ध नगरमध्ये डीसीपी महिला सुरक्षा वृंदा शुक्लाने याच केस संदर्भात सांगितलं की, सेक्टर ४१ मध्ये राहणाऱ्या दीपक कुमारने अशी तक्रार दिली आहे. तक्रारीत त्याने खुलासा केला की, सीमा(बदललेलं नाव) नावाच्या महिलेसोबत डेटिंग अॅपवर भेट झाली होती. सीमाने स्वत:ला अविवाहित सांगून अॅपवर रजिस्ट्रेशन केलं होतं. दोघांमध्ये संवाद झाला आणि शोभाने त्याला ओखला येथे भेटण्यासाठी बोलवलं होतं. तिथे दोघांनी सहमतीने शारीरिक संबंध ठेवले.
दीपकने आरोप लावत सांगितलं की, यानंतर त्याला ब्लॅकमेल करण्यात आलं. इतकंच नाही तर त्याच्या मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. पैसे दिले नाही तर दीपकला खोट्या रेप केसमध्ये अडकवण्याची धमकीही देण्यात आली. ज्यानंतर त्याने दबावात येऊन महिलेसोबत लग्नही केलं होतं. जेव्हा दीपकने चौकशी केली तर समजलं की, सीमा आधीपासूनच विवाहित आहे. पण सोशल मीडियावर ती स्वत:ला अविवाहित सांगते.
लग्नानंतरही ब्लॅकमेलिंग
एफआयआरमध्ये असाही आरोप लावण्यात आला आहे की, महिला लग्नानंतरही अशाप्रकारच्या ब्लॅकमेलिंगचं काम करते आणि डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरूणांसोबत मैत्री करून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवल्यावर शारीरिक संबंध ठेवते. नंतर त्यांच्यावर रेपची खोटी केस करण्याची धमकी देत त्यांना पैशांची मागणी करते.