शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

मनी लाँड्रिंग प्रकरण: सुकेश चंद्रशेखरनं नोरा फतेहीला गिफ्ट केली होती आलिशान कार, Photo आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 5:50 PM

तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandra Shekhar) संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात (200 Crore Money Laundering Case) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.

नवी दिल्ली-

तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandra Shekhar) संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात (200 Crore Money Laundering Case) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. सुकेश चंद्रशेखर यानं ईडीच्या चौकशीदरम्यान नोरा फतेही हिला १ कोटीहून अधिक किमतीची आलिशान कार गिफ्ट दिल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीचीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. यात नोराहनं कार गिफ्ट मिळाल्याबाबतचा उल्लेख केला होता. आता नोरा फतेही हिला गिफ्ट मिळालेल्या कारचा फोटो समोर आला आहे. नोरानं तिला गिफ्ट म्हणून मिळालेल्या कारसोबत एक फोटो टिपला होता. नोराचा बीएमडब्ल्यू कंपनीच्या एका आलीशान कारसोबतचा फोटो समोर आला असून फोटोत दिसणारी कार सुकेशनंच गिफ्ट दिलेली कार असल्याचं सांगितलं जात आहे. 

नोरा फतेही हिला कार गिफ्ट दिल्याची कबुली खुद्द सुकेश चंद्रशेखरनं दिली होती. नोराला कोणती कार गिफ्ट केली होती असं चंद्रशेखर याला विचारण्यात आलं असता त्यानं तुम्ही हे नोरा हिलाच विचारा असं म्हटलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार सुकेश आणि त्याची पत्नी लीना मारिया पॉल यांनी नोरा फतेही हिला १ कोटीहून अधिक किंमत असलेली BMW कार गिफ्ट म्हणून दिली होती. 

२०० कोटींचं मनी लाँड्रिंग प्रकरणजवळपास २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांची पोलीस कोठडी आज संपुष्टात आली आहे. त्यांना दिल्ली हायकोर्टात आज हजर करण्यात आलं. याआधी १४ ऑक्टोबर रोजी ईडीनं या प्रकरणात नोरा फतेही हिचाही जबाब नोंदवला आहे. या जबाबत नोरानंही कार गिफ्ट मिळाल्याचा कबुलीनामा दिला आहे. यावेळी नोरा आणि सुकेश यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली होती. सुत्रांच्या माहितीनुसार नोरा फतेही हिला ही कार डिसेंबर २०२० मध्ये चेन्नईमधील एका इव्हेंट दरम्यान देण्यात आली होती. 

नोरा चौकशीत काय म्हणाली?सुकेशवर केवळ नोरा फतेहीचीच नव्हे तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेही हिनं १४ ऑक्टोबर रोजीच एक पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं होतं. यात तिनं कोणत्याही मनी लाँड्रिंग प्रकरणात कोणत्याही पद्धतीचा सहभाग नसल्याचं म्हटलं होतं. आरोपीसोबत कोणतंही वैयक्तिक नातं नसून त्याला ओळखतही नसल्याचं तिनं म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीत ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं तिनं स्पष्ट केलं होतं. 

अनेक स्टार्सना फसवण्याचा होता कट -ईडीने या प्रकरणात या पूर्वीही जॅकलीनची चौकशी केली होती. आधी, जॅकलीनही या प्रकरणात सामील असावी, असे ईडीला वाटत होते. मात्र, नंतर ती स्वतःच या प्रकरणातील विक्टिम असल्याचे समोर आले. सुकेशने लीना पॉलच्या माध्यमाने जॅकलिनची फसवणूक केली होती. जॅकलीनने ईडीला दिलेल्या आपल्या पहिल्या जबाबात सुकेशशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केली होत्या. 

टॅग्स :Nora fatehiनोरा फतेहीBmwबीएमडब्ल्यूEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय