शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

पीडितेची साक्ष नाही तर डिएनए ठरला पुरावा, आरोपीला मृत्यू येईपर्यंत जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 9:38 PM

Crime News : पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संदीप सुदाम तिरमली (वय ३६,रा.शिरसगाव, ता.चाळीसगाव) याला न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात सात वर्षाची शिक्षा भोगून घरी परत आल्यावर पुन्हा पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संदीप सुदाम तिरमली (वय ३६,रा.शिरसगाव, ता.चाळीसगाव) याला न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.एन. खडसे यांनी गुरुवारी हा निकाल दिला. 

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, ३ जानेवारी २०२१ रोजी रात्री आठ वाजता पीडिता ही मैत्रीणींसोबत खेळत असताना संदीप तिरमली याने तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या घरात घेऊन गेला.यावेळी खाऊ घेण्यासाठी १० रुपयांच्या तीन नोटा देत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडिता रडतच घरी आली होती. तिच्या हातात असलेल्या नोटांवर रक्ताचे डाग होते. झालेला प्रकार तिने आईला सांगितला. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात कलम ३७६ (२) आय, ३७७ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ नुसार गुन्हा दाखल झाला होता.

पीडितेची साक्ष नाही, डिएनए ठरला पुरावाया खटल्याचे वैशिष्ट असे की, यात न्यायालयाने पीडितेची साक्ष नोंदविली नाही. तपासाधिकारी हेमंत शिंदे यांचा योग्य तपास, शास्त्रीय पुरावे व डीएनएचा अहवाल खूप महत्वाचा ठरला. त्याशिवाय फिर्यादी, तपासाधिकारी, डॉक्टर यांच्या साक्षीही तितक्याच महत्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील केतन ढाके यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यानंतर आरोपीने याआधी देखील २०१२ मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता, त्यात त्याने सात वर्ष शिक्षा भोगली, तरी देखील त्याच्यात सुधारणा झाली नाही. पुन्हा केलेले कृत्यू माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारे असल्याचा प्रभावी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी देविदास कोळी व केसवॉच दीपक महाजन यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगावSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळLife Imprisonmentजन्मठेप