शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने बंदुकीच्या धाकावर कोट्यवधींचा प्लॉट हडपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 8:58 PM

कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने साथीदारांच्या मदतीने बंदुकीच्या धाकावर कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर ताबा मिळवून हप्ता वसुली केली आहे. पीडित व्यापाऱ्याने याबाबत तक्रार दिल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्याची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने साथीदारांच्या मदतीने बंदुकीच्या धाकावर कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर ताबा मिळवून हप्ता वसुली केली आहे. पीडित व्यापाऱ्याने याबाबत तक्रार दिल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले आहे.संजय रहाटे रा. बजरंगनगर, मानेवाडा यांचा इतवारीत आंबेकरच्या घराजवळ प्लॉट होता. आंबेकर जमीन हडपण्याच्या कामात पटाईत आहे. त्याची रहाटे यांच्या जमिनीवर नजर केली. आंबेकरने रहाटेवर प्लॉट विकण्यासाठी दबाव टाकला. तो तयार न झाल्यामुळे त्याने रहाटेला कुटुंबीयांसह जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने रजिस्ट्री कार्यालयात येण्यास भाग पाडले. आंबेकरने बहुतांश प्रॉपर्टी आपल्या साथीदारांच्या नावाने खरेदी केली आहे. त्याने रहाटेचा प्लॉट नवाबपुरा येथील रहिवासी नीतेश पुरुषोत्तम माने याच्या नावावर खरेदी केला. नीतेश आंबेकरचा नातेवाईकही आहे. त्याने रहाटेला धमकी देऊन रजिस्ट्रीच्या कागदपत्रावर सही करण्यास सांगितले. हा सौदा ५५ लाख रुपयात करण्यात आला. नीतेशने रहाटेला रजिस्ट्रीच्या वेळी ५ लाख रुपयांचा चेक दिला. उर्वरीत ५० लाख रुपये आंबेकरच्या घरी देण्याचे आश्वासन दिले. रहाटे उर्वरीत ५० लाख रुपये घेण्यासाठी आंबेकरच्या घरी पोहोचला. आंबेकरने रुपये देण्याऐवजी रहाटेच्या कानाला बंदुक लावून जीवे मारण्याची धमकी दिली. रहाटेकडून रोख किंवा चेकच्या रुपाने ५ लाख रुपये देण्यास सांगितले. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन प्लॉटवर ताबा मिळविला. एप्रिल २०१५ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत हे प्रकरण सुरु होते. आंबेकरची दहशत आणि अनेक कमकुवत नागरिकांच्या संपत्तीवर त्याने ताबा मिळविल्यामुळे घाबरून रहाटे याने तक्रार दाखल केली नाही. गुन्हे शाखेने आंबेकर टोळीची पाळेमुळे उद्ध्वस्त केल्यामुळे रहाटेने याची तक्रार केली. रहाटेच्या प्लॉटची किंमत २ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. आंबेकर टोळीविरुद्ध आतापर्यंत १३ गुन्हे दाखल झाले आहेत. यात बलात्कार, फसवणूक, जमिनीचा ताबा मिळविणे, खंडणी मागणे, धमकी देणे आदींचा समावेश आहे. या प्रकरणात आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश आणि शैलेशसह १२ गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून ते तुरुंगात आहेत. या प्रकरणात तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. यात अकोलाचा कृष्णा सोटंगे, राजेश यादव, मुंबईचा जगन जगदाळे यांचा समावेश आहे.पोलिसांनी तिघांना फरार घोषित करून त्यांच्या घरावर नोटीस लावली आहे. समर्पण न केल्यास पोलीस तिघांची संपत्ती जप्त करणार आहेत. कृष्णा सोटंगे आंबेकरचा जवळचा आहे. आंबेकरने गुन्हेगारीच्या माध्यमातून गोळा केलेल्या कमाईचा मोठा वाटा कृष्णाजवळ आहे. त्याने अनेक बांधकाम योजनात गुंतवणूक केली आहे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो भूमिगत झाला आहे. पोलिसांनी केवळ पाच प्रकरणात आरोपींना अटक केली आहे. आरोपींना पकडल्यानंतर इतर प्रकरणात अटक करण्यात येणार आहे. आंबेकर टोळीविरुद्ध फसवणूक तसेच वसुलीच्या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. धमकी देऊन जमिनीचा ताबा घेणे ही त्याची दुसरी पद्धत आहे. या पद्धतीने त्याने बरीच संपत्ती गोळा केली आहे. त्या आधारावर आंबेकर टोळी विरुद्ध मकोकाची कारवाई केली जाऊ शकते.मदत करणाऱ्यांची भूमिका महत्त्वाचीदोन दशकांपासून गुन्हेगारी जगतात सक्रिय असूनही आंबेकरला कोणतीच शिक्षा झाली नाही. या दिशेने तपास केला असता पोलिसांना आंबेकरजवळ वकील, दलाल, अधिकारी, नेता आणि माध्यमात त्याचे संबंध असल्याची माहिती मिळाली. या लोकांच्या मदतीने तो साक्षीदार आणि पीडितांना धमकी देऊन आपला धाक दाखवित होता. त्यानंतर तो अनेक मोठ्या प्रकरणातून सहज बाहेर पडत होता. पोलीस तपासात अशा व्यक्तींची नावे उजेडात आली आहेत. आंबेकरला त्यांनी बरीच मदत केली आहे. त्या मोबदल्यात त्यांना आंबेकरने पैसेही दिले आहेत. पोलीस त्यांना धडा शिकविण्याचा गंभीरपणे विचार करीत आहे. यापैकीच एका मोठ्या पदावरील व्यक्तीची काही दिवसांपूर्वी बदली झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर