लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अट्टल गुन्हेगार हनी ऊर्फ नागेंद्र दीपक ठाकूर (वय २०, रा. गुरु तेगबहादूरसिंग नगर) याच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी सिनेस्टाईल मुसक्या बांधल्या. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी एक किमती पिस्तुलही जप्त केले.कुख्यात हनी ठाकूर हा अट्टल गुन्हेगार असून, शहरातील विविध पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसापूर्वी त्याचा प्रतिस्पर्धी गुंडांसोबत वाद झाला होता. तेव्हापासून ते दोघे एकमेकाचा गेम करण्याच्या तयारीत होते. आरोपी हनीने जबलपूरहून पिस्तुल विकत घेतले होते. त्याची त्याने दोन दिवसापूर्वी ट्रायलही घेतली होती. त्याने दोन राऊंड हवेत फायर केले होते. चित्रपटातील खलनायकासारखे पिस्तुलासह फोटो काढून ते मित्रांना पाठविले होते. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे आपल्या सहकाऱ्यांसह कुख्यात हनीचा शोध घेत होते. शुक्रवारी सायंकाळी अमरावती मार्गावरील फुटाळा वस्तीत तो कंबरेत पिस्तुल खोचून फिरत आहे. त्याच्याकडून गंभीर गुन्हा होण्याची भीती असल्याची माहिती खबºयाने गुन्हे शाखेच्या पथकाला कळविली. त्यानुसार, ताकसांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे धाव घेतली. फुटाळा वस्तीतील अक्षय मडावी याच्या घराजवळ कुख्यात हनी ठाकूर दिसताच पोलिसांनी त्याच्यावर सिनेस्टाईल झडप घातली. त्याला जेरबंद करून त्याच्याकडून विदेशी बनावटीचे वाटावे असे पिस्तुल जप्त केले. त्याला अंबाझरी ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.मोठा गुन्हा टळलाकुख्यात हनीला अटक केल्यामुळे एक मोठा संभाव्य गुन्हा टळला. तो मोकाट राहिला असता तर त्याने प्रतिस्पर्धी टोळीतील कुणाचा किंवा प्रतिस्पर्ध्यांनी त्याचा गेम केला असता. त्याला अटक करण्याची कामगिरी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक लक्ष्मीछाया तांबुसकर, एएसआय मोहनलाल शाहू, हवलदार संतोष मदनकर, रामनरेश यादव, रवी शाहू, शेषराव राऊत, योगेश गुप्ता आणि अरविंद मिश्रा आदींनी बजावली.
नागपुरात कुख्यात गुंड पिस्तुलासह जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:19 PM
अट्टल गुन्हेगार हनी ऊर्फ नागेंद्र दीपक ठाकूर (वय २०, रा. गुरु तेगबहादूरसिंग नगर) याच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी सिनेस्टाईल मुसक्या बांधल्या. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी एक किमती पिस्तुलही जप्त केले.
ठळक मुद्देदोन दिवसापूर्वी केली होते फायरिंग : फोटोही केले व्हायरल