शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

नागपुरातील कुख्यात कडवच्या पत्नीला अटक : २० लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 11:59 PM

कुख्यात मंगेश कडव याच्या बनवाबनवीत साथ देणारी त्याची पत्नी रुचिका मंगेश कडव हिला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. या कारवाईमुळे फरार असलेला मंगेश कडव आता लवकरच पोलिसांना शरण येऊ शकतो, असे मानले जात आहे.

ठळक मुद्देभूखंड दिलाच नाही, धनादेशही वाटले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात मंगेश कडव याच्या बनवाबनवीत साथ देणारी त्याची पत्नी रुचिका मंगेश कडव हिला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. या कारवाईमुळे फरार असलेला मंगेश कडव आता लवकरच पोलिसांना शरण येऊ शकतो, असे मानले जात आहे. ज्या गुन्ह्यात रुचिता मंगेश कडव हिला पोलिसांनी अटक केली तो गुन्हा हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे एका व्यक्तीला भूखंड दाखवून त्याच्याकडून मंगेश कडव याने वीस लाख रुपये घेतले होते. तो भूखंड कडव याचा नसल्याचे लक्षात आल्यामुळे पीडित व्यक्तीने त्याला दुसरा भूखंड मागितला असता कडवने नकार देऊन त्याला झुलविणे सुरू केले. नंतर त्याला रुचिका हिच्या खात्याशी संबंधित २० लाख रुपयांचे धनादेश दिले. मात्र ते वटलेच नाहीत. यासंबंधात पीडित व्यक्तीने रुचिकाकडे विचारणा केली असता तिने कानावर हात ठेवले. कडव याने केलेल्या फसवणुकीत तिचाही सहभाग असल्याची तक्रार हुडकेश्वर पोलिस ठाण्यात पीडिताने नोंदवली होती. या पार्श्वभूमीवर मंगेश कडवविरुद्ध गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारला. त्याच्याविरुद्ध अंबाझरी, सक्करदरा, बजाजनगर आणि हुडकेश्वर ठाण्यात गुन्हे दाखल केले. त्याच्याकडून सुमारे दीड कोटी रुपयांची चार वाहनेही जप्त करण्यात आली. त्यात हार्ले डेव्हिडसन, बीएमडब्ल्यू आणि दोन मर्सिडीज कारचा समावेश आहे.मंगेश कडवला अटक करण्यासाठी पोलिस त्याचा जागोजागी शोध घेत आहेत. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याच्यावरील दबाव वाढवण्यासाठी सोमवारी रुचिका कडवला अटक केली.सीताबर्डीत आज गुन्हा दाखल होणारनोकरीचे आमिष दाखवून एका पानटपरी चालकाकडून कडवने सहा लाख रुपये हडपल्याचे स्पष्ट झाले आहे. कडवविरुद्ध याप्रकरणी मंगळवारी सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी लोकमतला दिली.२४ तासात आत्मसमर्पणराजकीय प्रभावाखाली कट-कारस्थाने आणि गुन्हेगारी करणाऱ्या मंगेश कडवविरुद्ध पोलिसांनी ठोस कारवाई चालविली आणि त्याच्या पत्नीला अटक केल्यामुळे कडववर चांगलाच दबाव निर्माण झाला असून पुढच्या चोवीस तासात तो आत्मसमर्पण करू शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकमतला दिली आहे. पोलिसांनीही तशी शक्यता वर्तविली आहे.पोलिसांकडे तक्रारदारांची रीघकडवविरुद्ध पोलीस कडक कारवाई करीत असल्याचा विश्वास पटल्यामुळे आता अनेक तक्रारदारांनी गुन्हे शाखेत गर्दी केली आहे. आणखी पाच तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. त्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आहेत. त्यांची पडताळणी सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त राजमाने यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी