आता तरुण मुरारी बापूने महात्मा गांधींबद्दल वापरले अपशब्द, पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 02:01 PM2022-01-04T14:01:58+5:302022-01-04T14:09:05+5:30
Tarun murari bapu called mahatma gandhi a terrorist : आता नरसिंगपूरमध्ये भागवत कथा वाचक तरुण मुरारी बापू याने महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, जो देशाचे तुकडे करतो, तो राष्ट्रपिता कसा होऊ शकतो? माझा त्यांना विरोध आहे. देशद्रोही आहे.
मध्य प्रदेश - महात्मा गांधी यांच्याबाबत धर्म संसदेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराज याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. कालीचरण महाराजाने महात्मा गांधींवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता नरसिंगपूरमध्ये भागवत कथा वाचक तरुण मुरारी बापू याने महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, जो देशाचे तुकडे करतो, तो राष्ट्रपिता कसा होऊ शकतो? माझा त्यांना विरोध आहे. देशद्रोही आहे.
नरसिंगपूरमधील स्टेशन गंज पोलिसांनी तरुण मुरारी बापूविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तरुण मुरारी बापू याने सोमवारी छिंदवाडा रोडवरील वीरा लॉन येथे श्रीमद भागवत कथेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते. पुढे म्हणाले की, महात्मा गांधी महात्मा नाहीत आणि राष्ट्रपिताही होऊ शकत नाहीत. ते जिवंत असतानाच त्यांनी देशाचे तुकडे केले. म्हणूनच त्यांना देशद्रोही म्हटले पाहिजे.
काँग्रेसने तक्रार केली आहे
तरुण मुरारी बापूंच्या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला. पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने भादंवि कलम १५३, ५०४, ५०५ अन्वये गंज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तरुण मुरारी बापू अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.