राजस्थानच्या जोधपूरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका नवविवाहित व्यक्तीला लग्नाच्या ९ दिवसांनंतर पत्नीबाबत सत्य समजलं. हे सत्य समोर आल्यावर तो लगेच पोलीस स्टेशनमद्ये पोहोचला. पत्नीने लग्नाआधी तिच्या प्रियकराला केलेला एक मेसेज पतीच्या हाती लागला. पत्नीची इन्स्टाग्रामवरून प्रियकरासोबत केलेली चॅटींग पतीच्या हाती लागली. या चॅटींगवरून त्याला समजलं की, पत्नीला त्याच्यासोबत लग्नच करायचं नव्हतं. यानंतर या व्यक्तीने पत्नीविरोधात फसवणुकीची केस दाखल केली आहे.
काय होतं चॅटमध्ये?
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, पत्नी सुमनने इन्स्टाग्राम चॅटवर लग्नाआधी तिच्या प्रियकराला एक मेसेज पाठवला होता. ज्यात लिहिले होते की, 'मला हे लग्न करायचं नाहीये आणि जर लग्न झालंही तर तुला लग्न करावं लागेल. मी मम्मी आणि वहिणीची शपथ घेऊन सांगते तर तू मला सोडलं तर मी आत्महत्या करेन'. हे चॅटींग जसं पतीच्या हाती लागलं तो पोलिसांकडे गेला आणि त्याने तक्रार दाखल केली. (हे पण वाचा : माथेफिरू आशिक! रक्ताने भिजलेले पत्र, सुसाइडची धमकी...लग्न मोडलं म्हणून तरूणाने तरूणीचं जगणं केलं हैराण!)
अमेरिकेत राहतो पती
मीडिया रिपोर्टनुसार कोर्टाने या प्रकरणात सुमन तसेच तिच्या वहिणीविरोधात फसवणुकीसहीत इतरही प्रकरणात केस केली आहे. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं तेव्हा समोर आलं की, नवविवाहित महिलेचा पती रामेश्वर जांगडा हा अमेरिकेत राहतो. तो तिथे एका चांगल्या कंपनीत नोकरी करतो. तसेच त्याचा राष्ट्रपतींकडून सन्मानही करण्यात आला आहे. (हे पण वाचा : पत्नीच्या अफेअरला कंटाळून पतीने स्वत:वर झाडली गोळी, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ केल शेअर!)
सुमनसोबत रामेश्वरचं लग्न गेल्यावर्षी २६ जुलैला झालं होतं. ज्याच्या ९ दिवसांनंतर सुमन माहेरी गेली होती. त्यानंतर रामेश्वर अमेरिकेला गेला होता. तेव्हा सुमन आणि तिची वहिणी घराचं लॉक तोडून घरात शिरल्या. त्यानंतर त्याच्याविरोधात हुंडा, कौटुंबिक हिंसेचा गुन्हा दाखल केला.