नुपूर शर्मा यांच्या समर्थकाला जीवे मारण्याची धमकी, ५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 08:53 PM2022-07-13T20:53:02+5:302022-07-13T21:00:53+5:30

Nupur Sharma : याप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस तपासात आहेत.

Nupur Sharma's supporter receives death threats, 5 charged | नुपूर शर्मा यांच्या समर्थकाला जीवे मारण्याची धमकी, ५ जणांवर गुन्हा दाखल

नुपूर शर्मा यांच्या समर्थकाला जीवे मारण्याची धमकी, ५ जणांवर गुन्हा दाखल

Next

सिहोर : नुपूर शर्मा प्रकरण देशात शांत होण्याचे नाव घेत नाही आहे. राजकारणाव्यतिरिक्त धमक्यांचे सत्र सुरूच आहे. असेच एक प्रकरण मध्य प्रदेशातील सिहोर येथून समोर आले असून नूपुर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस तपासात आहेत.

'आय सपोर्ट नूपुर शर्मा' या पोस्टवरून आरोपी संतापले
सीहोरच्या गणेश मंदिरातील रहिवासी रोहित साळवी यांनी सांगितले की, 11 जून रोजी त्याने आय सपोर्ट नुपूर शर्मा सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. यानंतर काही लोक त्याला मारहाण करण्यासाठी त्याच्या घरी आले. त्या लोकांनी शेजाऱ्याला रोहित समजून शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात केली. रोहित घरी आल्यावर त्याच्या शेजाऱ्याने सांगितले की, काही लोक त्याला मारण्यासाठी आले आहेत.

पुन्हा धमक्या मिळाल्याची तक्रार
त्यानंतर पुन्हा तेच लोक रोहितला धमकावू लागले. याची तक्रार रोहितने कोतवाली पोलीस ठाण्यात केली. पोलीस ठाणे कोतवाली यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींची ओळख पटवली. यानंतर शहरातील रहिवासी असलेल्या साहिलसह अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करू शकतात.

पोलिस दखल घेण्याच्या मनस्थितीत नाहीत
या प्रकरणी पोलीस कोणतीही कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाहीत. कारण याआधी महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि राजस्थानमधील उदयपूरमध्ये तालिबानी हत्या झाल्या आहेत, ज्याचा देशातच नव्हे तर परदेशातही चर्चेचा विषय ठरला आहे. आता या प्रकरणी कोणती कारवाई होते ते पाहावे लागेल.

 

Web Title: Nupur Sharma's supporter receives death threats, 5 charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.