शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

नर्सने कोरोना उपचाराच्या नावाखाली १३ वर्षीय मुलाला ढकललं सेक्स रॅकेटमध्ये, ५४ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 9:49 PM

Sex Racket Case :सर्व सुरळीत सुरु असल्याचं भासवण्यासाठी  स्वर्णकुमारी या मुलीला स्वतःच्या देखरेखीखालीच वडिलांशी फोनवर बोलू देत असे.

गुंटूर - आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील १३ वर्षाच्या मुलीवर सहा महिने अनेकदा बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोरोनाच्या उपचाराच्या नावाखाली या मुलीला एका नर्सने आपल्या घरी नेलं आणि  तिच्यावर देह विक्रय करण्याची बळजबरी केली. दरम्यान तीन सेक्स रॅकेटमध्ये या मुलीचा वेश्या व्यवसायासाठी वापर झाल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी नर्स स्वर्णकुमारीसह ५४ जणांना अटक केली आहे. या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांमध्ये कथित दलाल आणि पुरुष ग्राहकांचा समावेश आहे. 

न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार  आठवीत शिकणाऱ्या या आई नसलेल्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याने २६ जून २०२१ रोजी गुंटूरच्या शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी रुग्णालयातील स्वर्णकुमारी नावाच्या एका महिलेने आपण नर्स असल्याचं सांगत या मुलीच्या वडिलांना विश्वासात घेतले. चांगल्या उपचारांसाठी, देखभालीचे आश्वासन देऊन तिला आपल्या घरी घेऊन जाण्याची परवानगी वडिलांकडे मागितली. मुलीचे वडील मजूरीचे काम करतात. त्यानुसार ती नर्स या मुलीला आपल्या घरी घेऊन गेली आणि काही दिवसांनंतर तिने या मुलीला वेश्याव्यवसाय ढकललं.

कथित नर्सन या मुलीला नेल्लोर, विजयवाडा, ओंगोल आणि हैदराबाद अशा ठिकाणी नेले आणि तिथं अनेक पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, आपली मुलगी नर्सच्या घरी सुरक्षित आहे, असं या मुलीच्या वडिलांना वाटत होतं. सर्व सुरळीत सुरु असल्याचं भासवण्यासाठी  स्वर्णकुमारी या मुलीला स्वतःच्या देखरेखीखालीच वडिलांशी फोनवर बोलू देत असे. दरम्यान, दोन महिने हा छळ सोसल्यानंतर या मुलीने त्या नर्सच्या तावडीतून पळून जाण्यात यश मिळवलं आणि ती विजयवाडा येथे पोहोचली. तेव्हा स्वर्णकुमारीने मुलीच्या वडिलांना ती बेपत्ता झाल्याची माहिती दिली आणि गुंटूरमधील नल्लापाडू पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल केल्याचं सांगितलं. तक्रार करूनही ही मुलगी सापडली नाही.

विजयवाडा येथे बसस्थानकावर घाबरून एकटीच बसलेल्या या मुलीला वेश्या व्यवसायातील दलाली करणाऱ्या एका महिलेनं हेरलं आणि गोड बोलून ती तिला आपल्या घरी घेऊन गेली. या महिलेने देखील  काकिनाडा, तनुकू अशा अनेक ठिकाणी नेऊन अनेक पुरुषांशी तिचा शरीरविक्रीसाठी सौदा केला. एका ठिकाणाहून दुसरीकडे नेलं जात असताना जससिंथा आणि तिची मुलगी हेमलता या मायलेकींच्या संपर्कात ही मुलगी आली. तिला मदत करण्याच्या बहाण्याने या दोघींनी तिच्याकडून सगळी माहिती गोळा केली आणि तिचा सौदा करणाऱ्या लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळले. या दोघींना देखील पोलिसांनी बेडया ठोकल्या. 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसAndhra Pradeshआंध्र प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याArrestअटकSexual abuseलैंगिक शोषण