रोहित टेके, लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव (जि. अहमदनगर): शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सुदेश चौक, सावरकर चौक, गोदावरी नदी पूल व पोलीस ठाणे परिसरातील रस्त्यावर सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणे तसेच वर्दळीच्या ठिकाणी भरधाव वाहन चालविणाऱ्या चार वाहनचालकावर पोलिसांनी मंगळवारी (दि.११) रात्री कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत.
याप्रकरणी साईनाथ रघुनाथ कासार ( वय ५१, रा. तिनचारी कोकमठाण ता. कोपरगाव ) यांचा छोटा हात्ती ( क्र. एम.एच.१४ सी. पी. ३५००), उत्तम भगवान शिरसाठ ( वय ६५, रा. खडकी ता. कोपरगाव ) यांची महिंद्रा जितो ( एम. एच. १७ बी. वाय.२७२२), सुनिल विष्णु बोराडे ( वय ३६, रा. दहेगाव ता. कोपरगाव ) यांची महिंद्रा जितो ( एम.एच.१७ बी.डी. २४९८ ) तर मतिन असलम बागवान ( वय २१, रा. सुभाषनगर कोपरगाव ) यांचा टाटा एस टेम्पो ( एम.एच.०४ एच.डी.४३५९ ) यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसात पोलिसांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे बेशिस्त वाहन चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.