ओडिशातील (Odisha) बरहमपूरमध्ये एक नवरी सजून धजून आपल्या आईसोबत नवरदेवाच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी पोहोचली. नवरीचा आरोप आहे की, लग्नाच्या दिवशी नवरदेव वरात घेऊन तिच्या घरी आला नाही. ज्यामुळे तिलाच त्याच्या घरी जावं लागलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वीच दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं आणि दोघांच्या परिवाराने काही खास लोकांच्या उपस्थितीत पारंपारिक हिंदू रिती-रिवाजासोबत हे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
नवरीच नवरदेवाच्या घरी गेली
नवरीचा आरोप आहे की, तिच्या परिवाराने अनेक तास वरात येण्याची वाट बघितली. सोबतच नवरदेवाला अनेकदा फोन कॉल केले आणि मेसेजही पाठवले. पण त्याने ना फोन कॉलला उत्तर दिलं ना मेसेजना. त्यानंतर नवरी तिच्या आईसोबत थेट नवरदेवाच्या घरीच पोहोचली आणि ठिय्या आंदोलन सुरू केलं.
सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आई व मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण दोघींनी पोलिसांवरही संताप व्यक्त केला. नवरदेवाच्या परिवाराकडून लाच घेतल्याचा आरोप त्यांनी पोलिसांवर लावला.
या प्रकरणी बहरमपूर एसपी पीनाक मिश्रा म्हणाले की, महिलेचा आरोप आहे की, तिचं लग्न सुमित नावाच्या तरूणासोबत झालं आहे. आधीही एका प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता महिलेने तरूण आणि त्याच्या परिवाराविरोधात पुन्हा तक्रार दाखल केली आहे. पोलीस म्हणाले की, चौकशी सुरू असून कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल.
नवरी म्हणाली की, तिने आणि सुमितने ७ सप्टेंबर २०२० ममध्य कोर्टात लग्न केलं होतं. तिच्या सासरचे लोक तिला पहिल्या दिवसापासूनच त्रास देत आहेत. सुरूवाताली त्याच्या वडिलांनी त्याला साथ दिली. पण नंतर तो त्याच्या परिवाराच्या सांगण्यावरून वागू लागला होता. मला अनेकदा त्रास दिला आणि रूममध्ये बंद केलं. यानंतर मी पोलिसात तक्रार दाखल केली होती. नंतर दोन्ही परिवारात चर्चा झाली. वाद संपला. २२ नोव्हेंबरला लग्नाची तारीख ठरली. पण ते लोक वरात घेऊन आलेच नाही. ज्यामुळे मला आईसोबत त्याच्या घरी जावं लागलं.