अमरावती: एका महिलेच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून त्यावर तिचे न्युड फोटोग्राफ्स अपलोड करण्यात आले. ७ ते ३० जानेवारीदरम्यान तो प्रकार घडला. याप्रकरणी, सायबर पोलिसांनी ३० जानेवारी रोजी रात्री एका अज्ञात मोबाईल युजरसह फेसबुक युजरविरूध्द विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, एका मोबाईल युजरने अमरावती येथील एका महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. त्यावर डीपी म्हणून महिलेलाच फोटो ठेवला. त्यामुळे तो फोटो पाहून अनेकांना ते अकाऊंट त्या महिलेचे असल्याचे भासविले गेले. आरोपीने त्या फेक अकाऊंटवर पिडित महिलेचा नग्न फोटो अपलोड केला. त्या फोटोखाली अश्लिल मेसेज देखील लिहिला. काही दिवसांनी ती बाब तिला माहित पडली. अ
नेक मित्र, मैत्रिणी व नातेवाईकांनी देखील फेसबुकवरचा तो प्रकाार तिच्या कानी घातला. त्यावर तिने ते फेक अकाऊंट पाहिले असता, ती नखशिखांत हादरली. तिने सायबर पोलीस ठाणे गाठले. अज्ञकात आरोपीने फेक अकाऊंटवरून आपले फोटो, अश्लिल फोटो व मजकूर पोस्ट करून आपला विनयभंग केल्याची तक्रार तिने नोंदविली. ३० जानेवारी रोजी रात्री ८.२६ वाजता यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने सोशल मिडियाच्या माध्यमातून आपला पाठलाग चालविल्याचे देखील पिडिताने म्हटले आहे.