शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सिंधी समाजबाबत केले होते आक्षेपार्ह विधान, आव्हांडावर गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Published: June 01, 2023 6:59 PM

उल्हासनगरात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

सदानंद नाईक, उल्हासनगर: गेल्या शनिवारी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह विधान केल्या बाबत गुन्हा दाखल करावा म्हणून बुधवारी शिवसेना शिंदे गट तर गुरवारी भाजपच्या वतीने आंदोलन केले. अखेर हिललाईन पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आपल्या विधानाचे विपर्यास केल्याची प्रतिक्रिया आव्हाड यांनी पत्रकारा सोबत बोलताना दिली आहे.

उल्हासनगर राष्ट्रवादी पदाधिकारी शिबीर बैठकीचे आयोजन शहरजिल्हाध्यक्षा पंचम कलानी यांनी गेल्या शनिवारी कॅम्प नं-५ येथे केले होते. पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे यांनी पदाधिकारी बैठकीला मार्गदर्शन केले. मार्गदर्शन वेळी जितेंद्र आव्हाड यांनी एक शेर चले, सौ सिंधी कुत्ते भुके अश्या वक्तव्य केल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या वक्तव्यावर राष्ट्रवादी पक्षातील निष्ठावंत गटाचे व कलानी विरोधक भारत गंगोत्री यांच्या समर्थकांनी प्रथम आक्षेप घेतला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी आव्हाड यांच्यावर सिंधी समाजबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गुन्हा दाखल करा. अशी मागणी करून बुधवारी आंदोलन करण्यात आले आहे.

 शिवसेना शिंदे गटाच्या आंदोलनानंतर भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरवारी आंदोलन करण्यात आले. पुरस्वानी यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्यांनी आव्हाड यांच्यावर सिंधी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर गुरवारी दुपारी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच गुन्हा दाखल करण्याचे सत्र भाजप व शिंदे गट यांनी सुरू केल्याचे ते पत्रकारां सोबत बोलतांना म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड