मुंबई - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तरीदेखील अनेक तरुण तरुणी टिकटॉक व्हिडिओ बनविण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. अँटोप हील येथे पोलिसांच्या व्हॅनसमोर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून टिकटॉकवर प्रसारित करणाऱ्या तिघांना पोलिसांनीअटक केली आहे. याप्रकरणी साहिल सरदार(१९), राज निर्मन(१८) आणि १७ वर्षीय अल्पवयीन या तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस व्हॅनच्या आतमध्ये पाहत व हातवारे करत "पिछले साहब को पूछो उन्होंने गली मे जीप डाला तो पाच दिन लग गये बहार आने को" असे म्हणत हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. अनेकांनी हा व्हिडिओ ट्विटरवर मुंबई पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली होती. याची दखल घेत अँटॉप हिल पोलिसांनी चार तासात या आरोपींचा शोध घेतला.