शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

नागपुरात तेलाच्या व्यापाऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 9:20 PM

तेलाच्या व्यापाऱ्याशी व्यावसायिक करार करून माल घेतल्यानंतर दोघांनी त्यांना सव्वाचार लाखांचा गंडा घातला. ११ ते २७ डिसेंबर २०१९ दरम्यान ही बनवाबनवीची घटना घडली.

ठळक मुद्देसव्वाचार लाखांचा माल नेला, पैसे दिलेच नाही : नंदनवनमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तेलाच्या व्यापाऱ्याशी व्यावसायिक करार करून माल घेतल्यानंतर दोघांनी त्यांना सव्वाचार लाखांचा गंडा घातला. ११ ते २७ डिसेंबर २०१९ दरम्यान ही बनवाबनवीची घटना घडली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी शुक्रवारी दोन ठगबाजांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.नीतेश प्रभाकर बेलगे (वय ३९) यांचा गोंदियाला तेलाचे कारखाना आहे. ते शेषनगर, खरबी मार्गावर राहतात. त्यांच्याशी आरोपी हितेश अतवानी आणि अजहरुद्दीन नामक दोघांनी ११ डिसेंबरला संपर्क साधला. तेलाचा व्यवसाय करतो, असे सांगून त्यांनी बेलगेंना विविध प्रकारच्या तेलाची किंमत विचारली. त्यानंतर सौदेबाजी करून नागपूरकरिता वितरणशीप हवी असल्याचे सांगितले. व्यावसायिक करार झाल्यानंतर बेलगे यांच्याकडून आरोपींनी ५ लिटर फल्ली तेलाच्या १७१ कॅन (किंमत १ लाख ७७ हजार ८४० रुपये) आणि २ लाख ३९ हजारांचे जवस तेल असे एकूण ४ लाख १६ हजार ८४० रुपयांचे तेल घेऊन गेले. ठरल्याप्रमाणे दोन दिवसात पैसे द्यायचे होते. मात्र, आरोपींनी बेलगेंना तेलाचे पैसे दिलेच नाही. त्यामुळे बेलगेंनी आरोपींशी संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बेलगेंनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. एपीआय शिर्के यांनी प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर शुक्रवारी एपीआय जायभाये यांनी आरोपी हितेश आणि अजहरुद्दीनविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी