शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

Ola Electric स्कूटरच्या नावावर फसवणूक, बनावट वेबसाइटवरून 5 कोटींचा चुना, 20 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 4:08 PM

Ola Scooter Fraud : या घोटाळ्यातून एक हजाराहून अधिक लोकांची फसवणूक झाली आहे.

नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिक स्कूटर घोटाळ्याप्रकरणी (Ola Electric Scooter Scam) दिल्ली पोलिसांनी 20 आरोपींना अटक केली आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी हे आरोपी बनावट वेबसाइट (Fake Website) तयार करून लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. 

या घोटाळ्यातून एक हजाराहून अधिक लोकांची फसवणूक झाली आहे. रिपोर्टनुसार, अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्यांनी ग्राहकांना सेवा दिली नाही. 5 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दिल्लीच्या बाह्य उत्तर जिल्ह्याचे पोलीस पाटणा, गुरुग्राम आणि बंगळुरूमध्ये छापे टाकत आहेत. येथे आरोपींनी आपले कार्यालय सुरू केले होते.

ओला इलेक्ट्रिकने वर्षभरापूर्वीच भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश केला होता. स्कूटर आपल्या फीचर्समुळे आणि अत्यंत कमी बुकिंग रकमेमुळे खूप लोकप्रिय झाली. मात्र, सायबर गुन्हेगारांना स्कूटरच्या नावावरही फसवणूक करण्याचा नवा मार्ग सापडला आहे. या स्कूटरच्या लाँचिंगवेळी तुम्ही फक्त 499 रुपयांमध्ये बुक करू शकत होता. मात्र, सध्या बुकिंगची रक्कम 999 रुपयांवर गेली आहे.

आतापर्यंत तीन स्कूटर लाँचओला इलेक्ट्रिकने भारतीय बाजारात तीन वेगवेगळ्या स्कूटर लाँच केल्या आहेत. त्यापैकी सर्वात महाग स्कूटर OLA S1 Pro आहे, ज्याची किंमत 1,39,999 रुपये आहे. दुसरी स्कूटर OLA S1 Pro आहे, ज्याची किंमत 99,999 रुपये आहे. या स्कूटर यावर्षी 15 ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आल्या. तर तिसरी स्कूटर नुकतीच लाँच झालेली Ola S1 Air आहे. या स्कूटरची किंमत 84,999 रुपये आहे.

टॅग्स :OlaओलाCrime Newsगुन्हेगारीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर