शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

अजब चोरटे! घरात घुसले, वृद्ध दाम्पत्याला लुटले; निघताना पाया पडले, ५०० रुपये देत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 5:20 PM

वृद्ध दाम्पत्याला बांधून ठेऊन ४ चोरट्यांनी लंपास केली रोकड; चार लाखांचे दागिनेदेखील लांबवले

गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये चोरीची एक विचित्र घटना घडली आहे. एका वृद्ध दाम्पत्याला बांधून त्यांच्या घरात एका टोळीनं चोरी केली. राजनगरच्या सेक्टर-९ मध्ये हा प्रकार घडला. माजी महापौर आशू वर्मा यांच्या बंगल्याजवळ वास्तव्यास असलेल्या सुरेंद्र वर्मांच्या घरात चोरी झाली. घटना घडत असताना सुरेंद्र आणि त्यांची पत्नी अरुणा घरी होते. बुलंदशहर रोड परिसरात असलेल्या औद्योगिक क्षेत्रात सुरेंद्र यांचा कारखाना होता. मात्र तो त्यांनी बंद केला.

सुरेंद्र वर्मा यांना तीन मुली आहेत. तिघींचे विवाह झाले असून त्या परदेशात राहतात. सोमवारी रात्री साडे तीन वाजता चार चोर त्यांच्या घरात शिरले. त्यांनी चेहरे झाकलेले होते. गॅस कटरच्या मदतीनं लोखंडी दरवाजा कापून, त्यानंतर काचा फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मला न विचारता पाणीपुरी का आणली? दाम्पत्यामध्ये वाद; पत्नीची विष पिऊन आत्महत्या

एका चोरट्याच्या हाती बंदूक होती. तर इतर तिघांच्या हाती सुरे होते. चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला बांधून ठेवलं. दीड लाख रुपयांची रोकड आणि चार लाखांचे दागिने घेऊन चोरट्यांनी पळ काढला. वर्मा यांनी या प्रकरणी कवीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

चोरट्यांनी रोख रक्कम आणि दागिन्यांसह पळ काढताना वृद्ध दाम्पत्याची माफी मागितली. चोरट्यांनी दाम्पत्याचे पाय धरले. आम्हाला माफ करा. आम्ही ६ महिन्यांत तुमचे पैसे आणि दागिने परत देऊ, असं चोरट्यांनी घरातून बाहेर पडताना दाम्पत्याला सांगितलं. त्यांनी घरातून निघताना दाम्पत्याला ५०० रुपये दिले.