नवी मुंबई - वृद्ध व्यक्तीने तीन मजली घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. इंजिनीयरची आत्महत्येची घटना ताजी असतानाच कोपर खैरणे मध्येच ही घटना घडली आहे. मृत व्यक्तीला दारूचे व्यसन होते, त्यामुळे दारू न मिळाल्याच्या कारणावरून आत्महत्येची शक्यता वर्तवली जात आहे.कोपर खैरणे सेक्टर 2 येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास हि घटना घडली आहे. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घराच्या छतावरून काहीतरी पडण्याचा आवाज आला यामुळे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर येऊन पाहणी केली असता, सदर 50 वर्षीय व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे आढळून आले. परंतु त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
त्याठिकाणी ते पत्नी व मुलांसह रहायला होते. घरातील सर्वजण झोपले असता छतावर जाऊन त्यांनी उडी मारल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना दारूचे व्यसन होते असेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे लॉकडाऊन मुळे दारू न मिळाल्याच्या कारणामुळे देखील त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सदर घटनेची नोंद कोपर खैरणे पोलिसठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मंगळवारीच कोपर खैरणे सेक्टर 4 मध्ये राहणाऱ्या इंजिनिअर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सदर वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर त्यांच्या आत्महत्येमागे इतर काही कारण आहे का ? याचीही चौकशी पोलीस करत आहेत.
हृदयद्रावक! बेवारस पडला होता मृतदेह, चिमुकल्याचा फोटो पाहून डोळ्यात तरळतील अश्रू
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार
Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस