जळगाव : किराणा दुकानावर जाण्याच्या बहाण्याने ११ वर्षीय मुलीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात सुभाष हरचंद महाजन (५५, रा.वाडे, ता.भडगाव) याला जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी दोषी ठरविले. १४ सप्टेंबर रोजी शिक्षेची सुनावणी होणार आहे. न्या.आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरु आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, १८ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ११.३० वाजता सुभाष हरचंद महाजन याने पीडित बालिकेला किराणा दुकानावर जाण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व दरवाजा बंद करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडितेच्या वडीलांनी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन कलम ३७६ (२)(आय)(एच) व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारतर्फे अॅड.चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तीवाद करुन वाईट कृत्याच्या परिणामाबाबत समाजात योग्य संदेश जावा यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली. न्यायालयासमोर आलेले पुरावे व अॅड.बोरसे यांचा युक्तीवाद पाहता बुधवारी न्यायालयाने आरोप महाजन याला दोषी ठरविले. १४ सप्टेबर रोजी शिक्षेची सुनावणी केली जाणार आहे. आरोपीतर्फे अॅड.मुकेश शिंपी यांनी कामकाज पाहिले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार
‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’
लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक