अकाेला : मुर्तीजापूर शहर पाेलिस स्टेशनच्या हद्दीत एका चिमुकल्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आराेपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही़ डी़ पिंपळकर यांच्या न्यायालयाने साेमवारी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली़. यासाेबतच एक लाख ६० हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने आराेपीस ठाेठावला आहे़. आकाेट तालुक्यातील वडाळी देशमूख येथील मुळचा रहीवासी असलेला पंजाबराव तानुजी राठाेड वय ५५ वर्ष याने मुर्तीजापूर शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहीवासी असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर १४ जुलै २०१९ राेजी अनैसर्गिक अत्याचार केले हाेते़. या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही नराधमाने मुलाला दिली हाेती़. त्यामूळे मुलाने काही दिवस हा प्रकार कुणालाही सांगीतला नाही़ मात्र मुलाच्या आइच्या हे लक्षात येताच त्यांनी मुलाला विश्वासात घेत विचारणा केली असता पंजाबराव राठाेड याने अनैसर्गिक अत्याचार केल्याची माहीती आइला दिली़. त्यानंतर दाेघांनीही तातडीने मुर्तीजापूर शहर पाेलिस स्टेशन गाठून या प्रकरणाची तक्रार दिली़ वैद्यकीय तपासणी करून पाेलिसांनी आराेपी पंजाबराव राठाेड यांच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला़. या प्रकरणाचा तपास मुर्तीजापूर शहर पाेलिस स्टेशनच्या पीएसआय संगीता गावंडे यांनी करून दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले़. जिल्हा व सत्र न्यायालयाने दाेन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आराेपीविरुध्द आढळलेल्या ठाेस पुराव्यांच्या आधारे त्याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ अन्वये १० वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड, पाेस्काेच्या कलम ३ अन्वये १० वर्षांचा कारावास व ५० हजार रुपये दंड, पाेस्काेच्या कलम ५ अन्वये १० वर्षांचा कारावास व ५० हजार रुपये दंड,पाेस्काेच्या कलम १२ अन्वये ३ वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ दंड न भरल्यास अतीरीक्त सहा महीन्यांच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे़. या प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अॅड के़ बी़ खाेत यांनी कामकाज पाहीले़ तर काेर्ट पैरवी अधिकारी म्हणूण एएसआय प्रविण पाटील, संजय भारसाकळे यांनी काम पाहीले़.
मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आराेपीस १० वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2022 5:42 PM