साहिबगंज - झारखंडमधील साहिबगंज येथून एका हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मेहंदीपूर या गावात एका वृद्ध व्यक्तीने महिलेचे शीर धडापासून वेगळे करून डोक्यावरचे केस कापून पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिथे गेल्यानंतर पोलिसांना तो म्हणाला, मी माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला. राधानगर पोलिसांनी त्वरित वृद्धाला अटक केली. ही घटना मंगळवारी रात्रीची आहे.
वृद्धाने आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी वडिलांनी एका महिलेती हत्या केली. ६० वर्षीय महिलेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून शीर धडावेगळे केले आणि शीर घेऊन आरोपीने पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. पोलिसांनी तात्काळ या व्यक्तीला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.दोन दिवसांपूर्वी २५ वर्षीय तरुणाचा एका आजारामुळे मृत्यू झाला. मात्र, या मुलाचा मृत्यू जादूटोण्यामुळे झाला असल्याचो चर्चा गावात रंगली होती. ६० वर्षीय महिला मतलू चौडे या महिलेने जादूटोणा केल्यानं स्वाधीन टुडूचा मृत्यूच्या दारात पोचवल्याची गावात अफवा पसरली आणि वडिल सकल टुडूचा राग अनावर झाला आणि त्याने बदल घेण्याचा ठाम निश्चय केला. मुलाचा अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्याने सूड उगवण्याचा विचार केला.वृद्धाने महिलेचा गळा चिरलासकल टुडूने आपल्या मुलाचा मृतदेह सुरक्षित ठेवला आणि मंगळवारी रात्री त्याने गळा कापून मतलूची हत्या केली. यानंतर रात्री अकराच्या सुमारास त्याने शीर हातात पकडून राधानगर पोलिस स्टेशन गाठले. राधा नगर पोलिसांनी तातडीने घटनेची माहिती एसडीपीओ अरविंदकुमार सिंग यांना दिली आणि घटनास्थळी पोहोचल्यावर सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्याशिवाय स्वाधीन टुडूचा मृतदेहही पोलिसांनी ताब्यात घेतला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.पोलिस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेतया घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते, तर पोलिस अधीक्षक अनुरंजन किसापोटा यांनी घटनेची चौकशी करत असताना सांगितले की, ही घटना मंगळवारी उशिरा घडली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. या घटनांमध्ये सामील झालेल्यांना सोडणार नाही.
अन्य महत्वाच्या बातम्या...
विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर
Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल
विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस
पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा
पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य
किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ