शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

न्याय मिळाला! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृध्दाला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 9:10 PM

न्यायालय : आरोपीला व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे केले हजर

ठळक मुद्देसहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांची  पदोन्नतीने बदली झाल्यानंतर सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन ९ आॅक्टोबर २०१८ रोजी सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

जळगाव : शौचास गेलेल्या ११ वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने उचलून नेऊन तिच्यावर निर्जनस्थळी बलात्कार केल्याच्या प्रकरणात तुकाराम रंगनाथ रंगमले (६०,रा.नशिराबाद, ता.जळगाव) याला दोषी धरुन न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.

तालुक्यातील नशिराबाद येथे १३ आॅगस्ट २०१८ रोजी दुपारी ४ वाजता ही घटना घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात बलात्कार व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ५ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. चौकशीअंती तपासाधिकारी आर.टी.धारबळे यांनी आरोपीला १४ रोजी अटक केली होती. त्यानंतर पीडितेचा वयाचा दाखला व इतर पुरावे गोळा केले. सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांची  पदोन्नतीने बदली झाल्यानंतर सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन ९ आॅक्टोबर २०१८ रोजी सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.गुन्हा घडल्यापासून आरोपी  कारागृहातगुन्हा घडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून आरोपी हा जळगाव कारागृहात आहे. सोमवारी आरोपी रंगमले याला कारागृहातून व्हीडीओकॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. न्या. लाडेकर यांनी त्याला दोषी धरले असता आपल्याला कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती त्याने न्यायालयाला केली, मात्र जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी त्यावर जोरदार हरकत घेवून पीडितेचे वय, आरोपीचे वय व त्याने केलेला घृणास्पद प्रकार पाहता त्याला कोणतीही दया दाखवू नये व जन्मठेपेची शिक्षा द्यावी असा युक्तीवाद केला. न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पीडिता, पीडितेचे वडील, सहायक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, सचिन बागुल, पंच नरेंद्र साळुंखे, सहायक गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांना तपासण्यात आले. पीडिता, चेतन धनगर व वैद्यकिय अधिकाºयाची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके तर आरोपीतर्फे अ‍ॅड.संतोष सांगोळकर यांनी काम पाहिले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

 

दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू        

 

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही 

टॅग्स :Rapeबलात्कारCourtन्यायालयJalgaonजळगावPoliceपोलिस