झारखंडमध्ये झुंडबळीच्या घटना काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. आता सिमडेगा येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्याच्या ठेठईटांगर ठाण्याच्या हद्दीत कुटपाणी येथे एका वृद्ध महिलेला चेटकीण असल्याच्या गैरसमजूतीतून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिला मोठ्या प्रमाणात भाजली गेली असून ठेठईटांर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं आहे. अफवेला बळी पडलेल्या महिलेचं नाव झरियो देवी असल्याचं सांगितलं जात आहे.
६० वर्षीय झरिया देवी दीपाटोली येथील फॉलो डुंगडुंग यांच्याकडे एका तेराव्याच्या विधीसाठी गेल्या होत्या. रात्री उशीरा घरी परतत असताना चेटकीण गावात आल्याची अफवा पसरली गेली आणि झरिया देवी यांच्या तेल व इतर ज्वलनशील पदार्थ ओतून आग लावण्याचा प्रकार गावकऱ्यांनी केला आहे. यात झरिया देवी गंभीर स्वरुपात भाजल्या गेल्या आहेत.
माध्यमांमधील वृत्तानुसार घटनेच्यावेळी संबंधित महिलेचा पती तिच्यापासून थोडा दूर अंतरावर असल्यानं त्याला नेमकं काय घडतंय हे पटकन कळू शकलं नाही. घटनेची माहहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये फ्लोरेंस डुंगडुंग, सिलबीयुस डुंगडुंग, रवी सोरेंग, ज्योती सोरेंग आणि हेमंत टेटे यांचा समावेश आहे.
८ ते १० जणांनी केली मारहाणसमोर आलेल्या माहितीनुसार, गावात पीडीत महिलेची एकूण दोन घरं आहेत. एका घरात तिचे सासू-सासरे राहत होते. तर दुसऱ्या घरात महिला आपल्या पती आणि मुलांसह राहत होती. बुधवारी संध्याकाळी सासू-सासऱ्यांना काही लोक फ्लोरेंस डुंगडुंग यांच्या घरी त्याची पत्नीच्या मृत्यू पश्चात आयोजित भोज भात कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी घेऊन गेले होते. त्यानंतर काही तासांनी फ्लोरेंस डुंगडुंग याच्याकडून झरियो देवी यांच्यावर चेटकीण असल्याचा आरोप केला आणि घटनास्थळावर उपस्थित असलेल्या ८ ते १० जणांनी झरियो देवी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करत महिलेवर ज्वलनशील पदार्थ टाकून आग पेटवण्यात आली. यात महिला गंभीर जखमी झाली. महिलेच्या पतीला देखील मारहाण करण्यात आली.