मॉस्को – रशियात एका महिलेने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत स्वत:सह पोटच्या दोन मुलांचाही जीव दिला आहे. ही ह्दय पिळवटून टाकणारी घटना ऐकून प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडाला आहे. या महिलेने तिच्या दोन्ही मुलांना कवेत घेऊन इमारतीच्या १९ व्या मजल्यावरुन उडी मारली आहे. या दुर्घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत महिलेचा पती सैन्यात अधिकारी आहे. त्यांना ही गोष्ट समजताच मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी सध्या या प्रकरणाचा तपास सुरू केला असून महिलेच्या हत्येचीही शक्यता नाकारता येत नाही असं त्यांनी सांगितले आहे.
द सनच्या रिपोर्टनुसार, महिला गेल्या काही दिवसांपासून मानसिक दडपणाखाली जीवन जगत होती. कधी कधी मुलांच्या जन्मानंतर महिलांना ही समस्या उद्भवते. महिलेने तिच्या शेजारच्यांना हे सांगितले होते. परंतु कुणीही याची कल्पनाही केली नव्हती ती महिला इतकं धोकादायक पाऊल उचलेल. ओल्गा जारकोवा(Olga Zharkova) तिच्या कुटुंबासह मॉस्कोतील एका इमारतीत १९ व्या मजल्यावर राहते. त्याठिकाणाहून महिलेने खाली उडी मारली.
महिलेने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहिली
१९० फूट उंचावरुन खाली पडताच ओल्गा जारकोवा आणि ३ वर्षाची दोन मुलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. ओल्गाने एक सुसाईड नोटही लिहिली होती. ज्यात तिने म्हटलंय की, मी माझ्या मुलांना या अत्याचारी जगात एकटं सोडू शकत नाही. त्यासाठी मी त्यांना माझ्यासोबत घेऊन चालले. महिलेने हे पाऊल उचलण्यापूर्वी शेजाऱ्यांशी संवाद साधला होता. तेव्हा मी स्वत:ला खूप एकटी समजतेय. मला कंटाळा आलाय असं तिने सांगितले होते. याच कारणामुळे कदाचित महिलेने आत्महत्या केली असावी असा अंदाज बांधला जात आहे.
आर्मी अधिकाऱ्याला बसला मोठा धक्का
या ह्द्रयद्रावक दुर्घटनेनंतर मृत पतीला मोठा धक्का बसला. पोलिसांनी सांगितले की, ओल्गा जारकोवाने तिच्या दोन मुलांना कवेत घेऊन १९ व्या मजल्यावरुन खाली उडी मारली. जवळपास १९० फूट उंचावरुन खाली कोसळल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या काहीही सांगणं योग्य राहणार नाही. अद्याप मृत महिलेचा पती सैन्य अधिकारी यांचा जबाब नोंदवणं बाकी आहे.