ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळला हायकोर्टाचा मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 03:47 PM2019-07-31T15:47:02+5:302019-07-31T15:50:05+5:30

नाशिक पोलीस दलात कार्यरत असलेल्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

Olympic player Dattu Bhoknal get big relief from high court | ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळला हायकोर्टाचा मोठा दिलासा

ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळला हायकोर्टाचा मोठा दिलासा

Next
ठळक मुद्देनाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील शिपाई आशा दत्तू भोकनळ (२६) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात दत्तू भोकनळ विरोधात फिर्याद दिली आहे. आता भोकनळ यांचा ऑस्ट्रेलिया येथे पुढच्या महिन्यात होणाऱ्या नौकानयन स्पर्धेत सामील होण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मुंबई - भारताचा ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळला हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. दत्तू यांच्या पत्नीनं ४९८(अ) कलमाखाली दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करण्यास हायकोर्टाने सांगितले असून तक्रारदाराच्या आरोपांत तथ्य दिसत नसल्याचं हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. नाशिक पोलीस दलात कार्यरत असलेल्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

पत्नीने दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचार आणि फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यासाठी दत्तू यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. भारताचा आघाडीचा रोईंगपटू म्हणून दत्तू भोकनाळ ख्यात आहे. रिओ  ऑलिम्पिक  २०१६च्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नौकानयनपटू दत्तू बबन भोकनळ यांच्या विरोधात एका पोलीस महिलेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आपल्याशी विवाह करूनही दत्तू भोकनळ हा आपला स्वीकार न करता शारिरीक, मानसिक छळ करीत असल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दाखल केली. 

नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील शिपाई आशा दत्तू भोकनळ (२६) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात दत्तू भोकनळ विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आळंदी येथे २२ डिसेंबर २०१७ रोजी आपला दत्तू यांच्याबरोबर विवाह झाल्यानंतर आशा यांच्या घरी व पुणे येथे दोघे काही दिवस पती-पत्नीप्रमाणे एकत्रही राहिले. दत्तू यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ९ फेब्रुवारी २०१९ रोजी गावी जाऊन सर्वांसमक्ष लग्न करण्याचे ठरून लग्नाची खरेदीही केली. परंतु, सर्व तयारी करूनही दत्तू यांनी लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी तब्येत ठीक नसून दवाखान्यात अ‍ॅडमिट असल्याचे सांगत ७ फेबु्रवारीला लग्नाला येणार नसल्याचे कळविले. तसेच पुन्हा फोन करून लग्नाविषयी विचारले तर विष घेऊन आत्महत्या करू, असेही धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दि, १३ व १४ फेब्रुवारी रोजी दत्तू भोकनळ आडगाव पोलीस मुख्यालय येथे आशा भोकनळ यांच्या घरी येऊन त्यांना शिवीगाळ करीत वादावादी केल्याचेही फिर्यादीचे म्हणणे आहे. दरम्यान, संगमनेर येथे २४ फे ब्रुवारी २०१९ पुन्हा नातेवाइकांसमोर विवाह करण्याचे ठरले. लग्नाची तयारी करूनही पुन्हा लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी दत्तू यांनी लग्नास नकार देत आपला नाद सोडून देण्याचे सुनावले. ३ मार्चला आशा यांनी पुणे येथे जाऊन दत्तू यांच्याशी चर्चा केली, परंतु त्यांनी एकदा लग्न केलेले आहे. पुन्हा विवाहसमारंभ करणार नाही व आपल्यासोबत घरीही नेणारही नसल्याचे सांगत आपली फसवणूक केल्याचा आरोप आशा भोकनळ यांनी फिर्यादीतून केला आहे.    

Web Title: Olympic player Dattu Bhoknal get big relief from high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.