अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने घरातल्या घरातच बनावट चेक तयार करून एक ‘पोर्श 911 टर्बो’ लग्जरी कार खरेदी केली. या कारची किंमत जवळपास $140,000 आहे. भारतीय चलनामध्ये ही रक्कम काही कोटींमध्ये जाते. पोलिसांनी या व्यक्तीला अटक करून तुरुंगात रवानगी केली आहे.
फॉक्स बिझनेस‘च्या अहवालानुसार 27 जुलैला 42 वर्षांच्या कॅसेट विलियम केली याने डेस्टिनच्या पोर्श डिलरशीपला भेट दिली. तिथे त्याने पोर्श 911 टर्बो ही लक्झरी कार खरेदी केली. त्याने यासाठी कॅशिअरला कॉम्प्युटरवर हुबेहूब बनविलेला आणि घरच्याच प्रिंटरवर छापलेला चेक दिला. तसेच कार घेऊन गेला.
केली याने ही जर्मन कार खरेदी केल्यानंतर घडाळ्यांच्या दुकानात गेला. तेथे त्याने तीन रोलेक्सची घड्याळे खरेदी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने मिरमार बिचच्या एका ज्वेलरला जाऊन भेटला. त्याला त्याने 61521 डॉलरचा बनावट चेकही दिला. मात्र, ज्वेलरने चेक जोपर्यंच क्लिअर होत नाही तोपर्यंत घड्याळे ताब्यात न देण्याची अट घातली. यामुळे केलीचा प्रयत्न फसला.
पोर्शच्या शोरुमने चेक खोटा असल्याचे समजल्यानंतर पोलिसांना कार चोरीला गेल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी केलीला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपण हे चेक कॉम्प्युटरवर बनविल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी केलीची वॉल्टन काऊंटी जेलमध्ये रवानगी केली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
आजचे राशीभविष्य - 5 ऑगस्ट 2020; कर्क, सिंह राशींसाठी आज क्लेशाचा दिवस, सांभाळा
दोन दिवसांपूर्वीच कोरोनावर मात; माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुण्यात निधन
शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहानी
यंदा LIC चा आयपीओ मालामाल करणार; या कंपन्या करणार शेअर बाजारात एन्ट्री