शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने नवऱ्याला चोपला; प्रकरण ऐकून पोलीसही झाले चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 2:11 PM

स्वागत समारंभ आटोपल्यानंतर वधू-वर लग्नमंडपात आले, विधी पार पडले, लग्न उरकून दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातले

हमीरपूर - उत्तर प्रदेशातील हमीरपूर इथं लग्न मंडपातून सात फेरे घेऊन सासरी पोहचलेल्या मुलीने असं कृत्य केले ज्याने संपूर्ण गावात लोक आश्चर्यचकीत झाले. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने नवरीच्या डोक्यावरील पदर काढला त्यामुळे संतापलेल्या नवरीने पतीच्या कानशिलात लगावली. नवरीने नवऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे कुटुंबाला धक्का बसला. 

नवरीकडून झालेल्या मारहाणीमुळे नवरा आणि त्याचे कुटुंब पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्हीकडील मंडळी काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. सध्या पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. हमीरपूर जिल्ह्यातील सुरेश कुमार याचे लग्न इमिलिया गावातील मुलीशी झाले. नवरी असलेली संगीता या लग्नामुळे खुश नव्हती. मुलीकडच्या तिचे जबरदस्तीने लग्न लावले. लग्नाच्या दिवशी मुलीकडच्यांनी नवऱ्याकडील सर्व पाहुणेमंडळींचे आदरतिथ्य केले. 

स्वागत समारंभ आटोपल्यानंतर वधू-वर लग्नमंडपात आले, विधी पार पडले, लग्न उरकून दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातले. यानंतर नवरा-नवरीने मिळून सात फेरे घेतले. लग्नानंतर वधूचा निरोप समारंभ पार पडला. सासरी येताच वराच्या घरी पूजा करून इतर विधी पूर्ण करण्यात आले, मात्र लग्नाच्या रात्री वधूने वराला अशी भेट दिली, ज्यामुळे संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले.

पदर हटवताच नवरीने नवऱ्याचा कानाखाली मारलीलग्न पार पडल्यानंतर सासरच्या घरी येताच नववधूचा पारा चढला. खोलीत वराच्या मधुचंद्राची तयारी करण्यात आली होती. खोलीही चांगली सजवली होती. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, वराने वधूच्या डोक्यावरील पदर काढताच तिला राग आला, तिने हनिमूनच्या बेडवर वराला मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणात वराला दुखापत झाली. वधूचे हे रूप पाहून नवरा खोलीतून बाहेर आला आणि त्याने घरच्यांना घटनेची माहिती दिली. नातेवाइकांनी रात्रीच नवरीला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कुणाचे काही ऐकले नाही. 

रक्तबंबाळ झालेल्या वराला पाहून पोलीसही चकितकुरारा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक पवन कुमार पटेल यांनी शनिवारी सांगितले की, लग्नानंतर सासरी आलेल्या नववधूने वराला बेदम मारहाण केल्याची घटना पोलिस ठाण्यात आली. घटनेची माहिती मिळताच दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि घटनेची चौकशी करून दोघांनाही समजावून सांगण्यात आले, परंतु कोणतीही बाजू मागे हटण्यास तयार नाही. वधू आणि वरांना घरगुती प्रकरण कौटुंबिक न्यायालयात नेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगितले. तेथून हे प्रकरण निकाली काढले जाईल.