सुरत : गेल्या आठवड्यातच गुजरातच्या भूज जिल्ह्यामध्ये मुलींच्या हॉस्टेलमध्ये मासिक पाळी शोधण्यासाठी 68 विद्यार्थिनींना विवस्त्र करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यावरून मोठा गदारोळ झाला होता. आता पुन्हा त्याच गुजरातमध्ये सुरत महापालिकेच्या ट्रेन महिला कर्मचाऱ्यांसोबत सारखाच प्रकार घडला आहे. धक्कादयक म्हणजे काही अविवाहित महिलांना आक्षेपार्ह प्रश्नही विचारण्यात आले आहेत.
हे नवे प्रकरण राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सुरत महापालिकेच्या एका हॉस्पिटलमधील आहे. एसएमसी कर्मचारी संघाने याची तक्रार महापालिका अधिकाऱ्याकडे केल्याने या प्रकाराची वाच्यता झाली आहे. महापालिकेच्या 100 ट्रेनी महिला कर्मचाऱ्यांना एका आवश्यक फिटनेस टेस्टसाठी सुरत शहर आयुर्विज्ञान आणि संशोधन संस्थेमध्ये नेण्यात आले होते. यावेळी या महिला ट्रेनी क्लर्कना 10-10 च्या गटाने निर्वस्त्र उभे राहण्यास सांगण्यात आले. यावेळी त्यांच्या खासगी आयुष्यावरही प्रश्न विचारण्यात आले.
या साऱ्या प्रकरणावर हॉस्पिटलचे स्री रोग विभाग प्रमुख आश्विन वछानी यांनी सांगितले की, हॉस्पिटलच्या मार्गदर्शक तत्वांनुसार महिलांची शारीरिक तपासणी गरजेची आगे. पुरुषांची अशा पद्धतीची तपासणी केली जाते की नाही माहिती नाही. मात्र, महिलांसाठी या नियमांचे पालन करावे लागते. यामध्ये कोणत्या महिलेला रोग तर नाही ना हे पाहिले जाते.
खळबळजनक!... म्हणून ६८ विद्यार्थिनींना चक्क कपडे उतरवायला केली बळजबरी छोट्याशा जागेतही कार कशी पार्क करता येते? आनंद महिंद्रांकडून स्तुतीमरांडी यांच्यापाठोपाठ शत्रुघ्न सिन्हांची होणार भाजपमध्ये घरवापसी ?