मुंबई - प्रसिद्ध ब्रॅण्डेड कंपन्यांच्या बनावट मनगटी घड्याळांची सोशल मिडियाद्वारे विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा कक्ष - ४ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ही बनावट घड्याळं बनवणाऱ्या कारखान्याच्या मालकाला अटक केली आहे. हितेश प्रेमजी गडा (३८), कुंजन रमेश गडा (३१) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीत १ कोटी ५० लाख रुपयांची हजारो घड्याळ हस्तगत केली आहेत.लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात बनावट घड्याळं प्रसिद्ध ब्रॅण्डेड कंपनीच्या नावाने विकत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष - ४ च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मेनन स्ट्रीट येथील रियल टाइम्स शाॅप नं ६ आणि डिवाइस कलेक्शन शाॅप नं २०१ या दोन ठिकाणी छापा टाकून पहिल्या दुकानातून १८०५ घड्याळं तर दुसऱ्या दुकानातून ६६९३ बनावट घड्याळं पोलिसांनी हस्तगत केली. ही बनावट घड्याळं खरी असल्याचे भासवून विविध बाजारात ती विकली जात असे. त्यामुळे संबंधीत कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत होते. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत. अटक आरोपीला २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दीड कोटींची बनावट घड्याळे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 9:52 PM
पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीत १ कोटी ५० लाख रुपयांची हजारो घड्याळ हस्तगत केली आहेत.
ठळक मुद्देपहिल्या दुकानातून १८०५ घड्याळं तर दुसऱ्या दुकानातून ६६९३ बनावट घड्याळं पोलिसांनी हस्तगत केली.अटक आरोपीला २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.